बल्हारशाह नगरपरिषद समोरील वाहतुक सिग्नल त्वरीत चालु करा. - उमेश कुंडले, शहर अध्यक्ष मनसे.
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
ट्रफीक सिग्नल व शहरातील ट्राफीक समस्ये बाबद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बल्हारशाह पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
बल्हारशाह शहरा मध्ये वाढते अपघात, कायद्याचे उलंघन व कायदाची भीती नसल्या मुळे अतिशय निर्दलीय पद्धतीने तरुण मुलं गाडी चालवता व त्यांच्या मध्ये धाक नसून कुठल्या प्रकारची भीती नसल्यामुळे गाडीची अती स्पीड आणी मोठ मोठे हॉर्न लावून फीरतात मोठ्या हाॅर्णच्या मोठ्या आवाजाने नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या मधो मधे गाय बसून असता याने अपघात होण्याची संभावना नाकारता येत नाही तर लगतच पुराना बस्टॉप येथे वाईन शॉप असल्यामुळे तेथे काही लोक चुकीचा दिशेने वाहन चालवीतात त्यामुळे यावर आळा घालण्या करीता ट्रॅफिक पोलीस तेथे असणे गरजेचे आहे. तर जेणे करून कुठलाही अपघात होणार नाही. तर काही तरुण ट्रिपल सीट बसून गाडी जोरात चालवीतात जर ट्रॅफिक पोलीसांनी कायद्याची अंबलबजावणी केल्यास समोर असे अपघात होणार नाही व तरुणांन मध्ये कायद्याचे धाक असेल व नियम सुद्धा माहित पडनार अशी मागणी बल्हारशाह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बल्हारशाह पोलिस निरीक्षकांना निवेदनाच्या माध्यमातुन केली आहे.
सदर निवेदन देतांना मनसे जिल्हा उपाध्यक्ष विष्णु बुजोने,शहर अध्यक्ष उमेश कुंडले, सामाजीक कार्यकर्ते केतन तरगम सह मनसैनीक उपस्थीत होते.
