Top News

Big operation of Balharshah Police... Arrested two persons from the hill division.... 13.55 lakhs of valuables seized.....

बल्हारशाह पोलिसांची मोठी कारवाई...टेकडी विभागातील दोघांना केली अटक....13.55 लाखांचा मूद्देमाल जप्त.....



 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

गडचिरोली येथून शेजारच्या तेलंगणा राज्यातील गणेशपूर कत्तलखान्यात नेत असलेल्या गुरांची बल्हारशाह पोलिसांनी सुटका केली, तर दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन   28 गुरे आणि 13.55 लाख रुपयांचा मूद्दे माल जप्त केला आहे. मात्र अंधाराचा फायदा घेत एक आरोपी फरार झाला आहे.

अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बल्हारशाह पोलिसांनी ही कारवाई 11 सप्टेंबर रोजी पहाटे 5:00 वाजता च्या सुमारास विसापूर टोल नाक्याजवळ केली.

सोमवारी पहाटे बल्हारशाह पोलिसांचे पथक गस्तीवरून परततांना. त्यांना गुप्त माहिती मिळाली की, चंद्रपूर मार्गे ट्रक क्र. MH 34 AV 3172 मध्ये गुरे भरून तेलंगणा येथे नेण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश हत्तीगोटे, विलास खरात, चालक रतन पेंदाम हे चंद्रपूर बल्हारशाह रस्त्यावरील विसापूर टोल नाक्याजवळ पोहोचले. काही वेळाने ट्रक येताना दिसला. पोलिसांनी ट्रक चालकास इशारा करून थांबवले. यावेळी अंधाराचा फायदा घेत ट्रकमधून जात असलेल्या अमीन शेख नामक व्यक्तीने तेथून पळ काढला.

मात्र ट्रकमध्ये शेख अहमद शेख मुर्तजा (25, रा. बालाजी वॉर्ड), शेख इस्माईल शेख हुसेन (24, रा. राजेंद्र प्रसाद वॉर्ड) हे दोघे ट्रकमध्ये सापडले. पोलिसांनी दोघांची चौकशी करून ट्रकची झडती घेतली असता, त्यात 15 गायी, 11 वासरे आणि 2 बैल असे पाय बांधलेले आढळून आले. पोलिसांनी गुरांची सुटका करून उज्ज्वला गोरक्षण संस्था लोहारा यांच्या ताब्यात दिली. त्यांच्याकडे चौकशी केली असता ही जनावरे गडचिरोली जिल्ह्यातून शेजारील तेलंगणा राज्यातील गणेशपूर कत्तलखान्यात नेली जात असल्याचे निष्पन्न झाले.

या आधारे पोलिसांनी 10 लाख रुपये किमतीचा ट्रक व 3.55 लाख रुपये किमतीची गुरे जप्त केली असून शेख अहमद व शेख इस्माईल यांच्या विरोधात कलम 177, 83, 11 (1) डी, जी, 47 अ, ब, क आणि कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक केली.

न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चेतन टेंभुर्णे करीत आहे.

Previous Post Next Post