Top News

When will the increasing crime in Balharshah city be curbed? Citizens in the shadow of fear

बल्हारशाह शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लागनार तरी कधी ? नागरीक भितीच्या छायेत.....



 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

बल्हारशाह शहरातील स्थानिक टिळक वॉर्डात युको बँकेजवळील सास्ती रामनगर येथे राहणाऱ्या विजय नामक तरुणावर आठ ते दहा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

प्राप्तमाहितीनुसार स्कॉर्पिओ क्रमांक MH 34 AM 2191 मध्ये बसलेल्या विजय वर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्याला गाडीच्या बाहेर काढुन लाठ्या-काठ्यांनी व हात पायांनी मारहाण करण्यात आले. त्यानंतर त्यांची स्कॉर्पिओ गाडी गोल गोल फिरवून तेथे असलेल्या विद्युत खांबाला व भिंतीला धडकून वाहनाचे नुकसान करण्यात आले.   



सदर घटना दि.10 सप्टेंबर रविवारी च्या रात्री 10.30 वाजता च्या सुमारास घडली.जखमी विजय ला वैद्यकीय उपचार करून घरी पाठवण्यात आले. या घटनेची तक्रार बल्हारशाह पोलीस स्टेशन ला रात्री उशिरा नोंदविण्यात आली आहे.

10 सप्टेंबर रात्री सदर घटना रामनगर सास्ती येथील रहिवासी असलेल्या विजय नावाच्या तरुणासोबत घडली असून चंद्रपूर येथून कोळसा खाली करून आलेल्या ट्रकच्या चालकाला टोल टॅक्स (फास्ट टॅग) चे खर्च देऊन तो घरी परतत असतांना त्याला मारहाण केली. मारामारीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पोलीस यंत्रणा सुरक्षित वातावरण देऊ शकत नसल्याची भावना निर्माण होत आहे.


Previous Post Next Post