ऑटो मोठ्या दरीत कोसळल्याने 11 प्रवासी जखमी...!
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा येथे प्रवासी वाहतूक करणारा ऑटो पलटी झाल्याने 11 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत,सावळी सदोबा परिसरातील मौजा शिवर,पळशी,साखरतांडा,सुधाकरनगर या गावातून सकाळी सावळी सदोबा येथे प्रवासी घेऊन येणारा ऑटो,ऑटो क्रमांक MH-29 W-9369 या क्रमांकाचा ऑटो सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास सावळी सदोबा येथील घाटावर ऑटो चालकाचे भरधाव ऑटो वरून नियंत्रण सुटल्याने ऑटो घाटात असलेल्या मोठ्या दरीत कोसळल्यामुळे ऑटो मधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.
पारवा पोलिसांनी घटनेची माहीती मीळताच तत्काळ घटनास्थळ गाठुण ऑटो मधील गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना सावळी सदोबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र अपघात एवढा मोठा होता की ऑटोमध्ये प्रवास करणारे बहुतांश प्रवाशांची गंभीर अवस्था असल्याने त्यांना शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.
अपघातात जखमींची नावे -
विष्णू बद्री चव्हाण वय 60,दत्ता बदु राठोड वय 60,चंदा संदीप चव्हाण वय 30 वर्ष,राधा मोतीराम चव्हाण वय 35 वर्ष,पायल प्रताप राठोड वय 12 वर्ष,पंचीबाई गजानन राठोड वय 70 वर्ष,सुखदेव मोहन पवार वय 55,संगीता हिरासिंग राठोड वय 23 वर्ष,रघुनाथ महादू चव्हाण,वय 55,द्वारका सुभाष चव्हाण वय 22वर्ष,खुशी संदीप चव्हाण वय 13 वर्ष असल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात येत आहे.
अपघात एवढा गंभीर होता, मात्र सुदैवाने जीवित हानी टळली. देशात 75 वा अमृत महोत्सव साजरात होत असताना सुद्धा या परिसरातील अनेक गावांमध्ये अध्यापही एसटी बस पोहोचलेली नाही, हे मात्र तेवढेच खरं या घटनेचा पुढील तपास पारवा पोलीस स्टेशन तथा सावळी सदोबा दूरक्षेत्राचे पीएसआय संदीप बांरीगे करीत आहे.


