Top News

The central government has announced to levy 40 percent export duty on the export of onion, it should be canceled immediately.... The central government should remove the handshake from the market. - Adv. Vamanrao Chatap, Leader of Independent Bharat Party.

केंद्र सरकार ने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्याची घोषणा केली ती तात्काळ रद्द करावी....केंद्र सरकारने बाजारातला हस्त शेप काढुन टाकावा. - ॲड.वामनराव चटप , नेते स्वतंत्र भारत पक्ष.


 विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 


सध्या कांद्याचे घाऊक दर 20 रुपये प्रति किलोच्या दरम्यान असतांना केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. 

त्यामुळे कांद्याचे दर दबावात येऊन काही प्रमाणात घटणार आहेत. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने सुरू झाली आहेत. 

या वर विदर्भ माझा न्युज 24 ने स्वतंत्र भारत पक्षाचे नेते ॲड.वामनराव चटप यांची प्रतिक्रीया घेतली अस्ता केंद्र सरकार ने जो कांद्याच्या निर्यातीवर 40  टक्के निर्यात शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. ती तात्काळ रद्द करावी शेतकर्यांनकळे अद्यापही मोठ्या प्रमानात 40 ते 50 लाख क्वींटल कांदा शिल्लक आहे. सरकार च्या या निर्णयाने कांद्याचे भाव 1600/ 1500 क्विंटल वरून परत खाली याची शक्यता आहे. म्हणुन केंद्र सरकारनी बाजारातला हस्त शेप काढुन टाकावा. केंद्र सरकार चा या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. अशी प्रतिक्रीया विदर्भ माझा न्युज 24 सोबत बोलतांना स्वतंत्र भारत पक्षाचे नेते ॲड.वामनराव चटप यांनी दिली आहे.

कांदा महाग झाला तर सरकार पडत असतील तर कांदा स्वस्त केला तरी आम्ही सरकार पाडू शकतो हे शेतकऱ्यांनी दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन देखील स्वतंत्र भारत पक्षाचे नेते ॲड.वामनराव चटप यांनी केले आहे.

Previous Post Next Post