पाकिस्थान चे झेंडे,दुपट्टे विकणार्या Amazon कंपनीवर तातक्काळ कार्यवाही करून गुन्हा दाखल करा....विदर्भ राज्य आंदोलन समाती युवा आघडीचे मुख्यमंत्री व ग्रुह मंत्र्यांना निवेदण....
Amazon कंपनीने पाकिस्तानी वस्तु भारतात विकने त्वरीत बंद करावे व भारतवासीयांची जाहीर माफी मागावी - रोहीत लोनारे,विराआंस युवा आघाडी, शहर अध्यक्ष.
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
ॲमेझॉन.कोम ( Amazon.Com ) ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे जी ई-कॉमर्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, डिजिटल स्ट्रीमिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर लक्ष केंद्रित करते. याला "जगातील सर्वात प्रभावशाली आर्थिक आणि सांस्कृतिक शक्तींपैकी एक" म्हणून संबोधले गेले आहे, आणि जगातील सर्वात मौल्यवान ब्रँडपैकी एक आहे. सध्या Amazon च्या वेब साईट वर पाकिस्तानी झेंडे,दुपट्टे विकली जात असल्याचे लक्षात येताच विदर्भ राज्य आंदोलन समिती चे बल्हारशाह तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या मार्गदर्शनात विराआंस युवा आघाडीचे शहर अध्यक्ष रोहीत लोनारे यांनी बल्हारशाह पोलिस निरीक्षकांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्र,उपमुख्यमंत्री तथा ग्रुह मंत्र्यांना दि.23 ऑगस्ट 2023 रोजी निवेदन दिले आहे.
ऑनलाइन शाॅपींग चे मोठे व्यासपीठ असलेल्या Amazon कंपनीवर पाकिस्तानी झंडे दुपट्टे विकली जात आहेत, भारतात कंपनीने पाकिस्तानी वस्तु अथवा पाकीस्थानी झेंडे दुपट्टे विकने हे कीत पत योग्य आहे? असा प्रशन त्यांती निवेदनातुन मुख्यमंत्र,उपमुख्यमंत्री तथा ग्रुहमंत्र्यांना केला आहे. उद्या चालुन कुणीही समाज कंटक ऑनलाईन पाकिस्तान चा झेंडा विकत घेऊन काहीही चुकीच क्रुत करू शक्तो याने शांतता भंग होनार नाही याची शाश्वती कोन देणार? Amazon कंपनी तरी देईल का?
आपन या सर्व बाबी लक्षात घेऊन तातक्काळ Amazon कंपनी विरोधात कार्यवाही चे आदेश द्यावे व गुन्हा दाखल करावा व Amazon कंपनीने भारतीय नागरीकांची जाहीर माफी मागावी आणी समोर चालून अशी चुक होनार नाही अशी शाश्वती द्यावी. असे या निवेदनात नमुद केले आहे. तथ विदर्भवाद्यांनी Amazon कंपनीने पाकीस्थानी वस्तु झेंडे,दुपट्टे भारतात विकने बंद केले नाही तर विदर्भ राज्य आंदोलन समिती,युवा आघाडी च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे.
या वेळी निवेदन देतांना शहर अध्यक्ष रोहीत लोनारे,अमन कासोटे, युतीश मुन, निच्छय जगताप, राहुल देवईकर सह असंख्य विदर्भवादी उपस्थीत होते.
