बल्हारशाह येथे ट्रक च्या धडकेत आजीचा मृत्यु तर नातु जखमी....
अवघ्या काही वेळातच ट्रक सह चालकाला बल्हारशाह पोलिसांनी घेतले ताब्यात...
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
आजी आपल्या नातवाला सोबत घेत पेन्शन घेण्यासाठी दुचाकीवर राजुरा येथे जान्या करीता निघाली होती, मात्र वाटेतच विरूद्ध दिशेने येणार्या ट्रक ने त्यांना धडक दिली, या धडकेत 72 वर्षीय आजीचा जागीच मृत्यू झाला.सदर घटना दि. 30 ऑगस्ट 2023 च्या सायंकाळी 3:45 ते 4:00 वाजता च्या सुमारास घडली.
बल्हारशाह येथील डाॅ.आंबेडकर वार्ड रहिवासी लक्ष्मीबाई बंडेलवार व नातू नरसिंग कोंडा हे बुधवारी दुपारी पेन्शन घेण्यासाठी MH 34_8320 क्रमांकाच्या Activa ने राजुरा येथे जात होते. यादरम्यान दोघेही ब्रिटीएस प्लॉटच्या वेलंकी पेट्रोल पंपाजवळ पोहोचले, त्याचवेळी मागून येणाऱ्या एमएच 34 बीजी 9131 क्रमांकाच्या ट्रकने Activa धडक दिली.
त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. दरम्यान नातू नरसिंग कोंडा याने ट्रकचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक चालक ट्रक सह पळून गेला. या अपघातात नातू किरकोळ जखमी झाला. दरम्यान, ट्रकने धडक दिल्याने आजी लक्ष्मीबाई बंडेलवार (वय 72 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बल्हारशाह पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात पाठवला. तर काही वेळातच पोलिसांनी चालकाला अटक करून ट्रक जप्त केले.
घटनेचा अधीक तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात ASI सलीम शेख करीत आहे.
.jpg)
