Top News

Shocking: In Balharshah city, the incident that casts a pall over the relationship..... A minor girl was repeatedly raped by a murderous father. A case has been registered at Balharshah Police Station....The accused has been arrested....

धक्कादायक : बल्हारशाह शहरात नात्याला काळीमा फासनारी घटना.....


जन्मदात्या नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केले वारंवार बलात्कार....


बल्हारशाह पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल....आरोपी अटकेत.....



  विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

15 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी काल दि.२८/८/२०२३ बुधवारला बल्हारशाह पोलिसांनी एकाला अटक केली आहे.जन्म दात्या पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीला वासनेचे शिकार बनवले, मुलीवर तिच्या वडिलांनी अनेकदा बलात्कार केला. आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या आई आणि भावाला याची माहिती होती.

 मुलीने बल्हारशाह पोलीस स्टेशन गाठून फर्याद दिल्यानंतर वडील, आई आणि भावाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू करण्यात आली.  बल्हारशाह शहरातील रहिवासी असलेल्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  आरोपी पित्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  तर आई व भावाचाही तपास सुरू असून, घटनेचा पुढील तपास बल्हारशहा पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बल्हारशहा पोलीस करीत आहेत.

Previous Post Next Post