नागभीड तालुक्यातील सर्पदंश झालेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागाची गरज.....
जिल्हा रुग्णालयात करावी लागते रुग्णांना धावाधाव.....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
साधारणता जुन महिन्यात पावसाला सुरुवात झाली की,भुजलप्राणी जमीनीवर येतात त्यात अनेक विषारी साप आपल्या घराच्या अवती भोवती किंवा शेतामध्ये वावरत असतात. त्यात अनावधानाने मानवाला दंश करुन मानवाचा मृत्यू होत आहे. यावर्षी नागभीड तालुक्यात चार व्यक्तींचा सर्पदंश होउन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
शनिववारला चिखलगाव येथे १२ वर्षांचा मुलगा घरा जवळ खेळत असताना त्यांला सर्पदंश झाल्याने तळोधी व नंतर नागभीडच्या रुग्णालयात दाखल करुन त्यांच्या वर प्राथमीक उपचार करुन चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. त्यानंतर शिवनगर नागभीड येथील १२ वर्षाची मुलगी हिला रात्रीच्या सुमारास झोपेत सापाने चावा घेतला. बघितल्या नंतर लक्षात आले की त्या मुलीला मण्यार(दांडेकर) सापाने चावा घेतला. तिला नागभीडच्या रुग्णालयात उपचार करून समोरील उपचारा करिता नागपूरला पाठविण्यात आले. प्रकृती मात्र चिंताजनक आहे. परंतु अश्या रूग्नांसाठी अति दक्षता विभागाची गरज असते व ते नागभीड रुग्णालयात नाही आणि हे उपजिल्हा रुग्णालयात किंवा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असते. व ते होणं गरजेचं आहे.
नागभीड तालुक्यात १७० गावे आहेत त्याच बरोबर मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे येथे अतिदक्षता विभागाची आवश्यकता आहे. आपल्या घरा शेजारचा परिसर आपल्या मुलांचा शाळे मधील परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. आपण रात्री झोपताना खाट किंवा पलंगाचा वापर करायचा आहे. मात्र खाटेच्या अथवा पलंगाच्या आजू बाजूला लागून कुठलाही सामान ठेऊ नये जेणे करून सापाला चढायला आधार मिळणार नाही, आणि महत्वाचे सापाने चावल्याची घटना घडल्यास त्याला कुठल्याही मांत्रिकाकडे न नेता ग्रामीण रुग्णालयातच आणावे असे आवाहन सर्प मित्रांन कडुन करण्यात आले आहे. रुग्णाला नागभीड येथे पूर्ण उपचार मिळेल, व रुग्ण पूर्ण बरा होईल अशी व्यवस्था शासनाने करणे गरजेचे आहे.अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुक्यात सर्पदंशाच्या घटना वाढल्या आहेत.त्यात दिड वर्षात चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला नागभीड येथे प्राथमिक उपचार केल्या जाते. त्यानंतर त्याला चंद्रपूर किंवा नागपूर येथे भरती करावे लागते. त्यामुळे नागभीड येथे अतिदक्षता विभागाची गरज आहे. शासनाने नागभीड रुग्णालयात अतिदक्षता विभाग निर्माण करण्याची अत्यंत गरजेचे आहे.
- पवन नागरे सर्पमित्र नागभीड.
