भाजपा चंद्रपूर जिल्हा महामंत्री व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांची संवेदनशीलता !
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
भाजपा चंद्रपूर जिल्हा महामंत्री व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे हे भाजप ग्रामीण चे जिल्हा अध्यक्ष हरीष शर्मा यांच्या वाढदिवसाचा आयोजीत कार्यक्रम आटोपुन दि. 29 /8/2023 ला बल्लारशहा वरून नागभीडला परत येत असतांना सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास नागभीड जवळील चिंधिमाल येथे रस्त्यावर एक इसम बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर दुचाकी वरून पडल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आपली गाडी थांबवली व सदर अपघात व्यक्तीची पाहणी केल्यानंतर खांद्याला व इतर भागाला गंभीर मार असल्याने त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन ला घटनेची माहिती दिली
व उपचारास विलंब होऊ नये म्हणून सदर जखमी व्यक्तीला आपल्या वाहणात टाकून त्यांना नागभीड येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
अधिक माहिती घेतली असता जखमी भाऊराव गेडाम, ओवाळा येथील असून एका राईस मिल मध्ये काम करीत असून काम आटोपून ते घराकडे जात असतांना त्यांचा अपघात झाला. सदर जखमी डाव्या हाताच्या खांद्याला जबर मार लागला असल्याने त्यांना पुढील उपचारकरिता ब्रम्हपूरी येथे रेफर करण्यात आले.


