Top News

Terrible accident on Nagpur Nagbhid highway.....Truck collided with bus...Truck driver seriously injured...... The injured in the bus were admitted to Nagbhid Rural Hospital.

नागभीड - नागपूर  महामार्गावर भीषत अपघात.....ट्रक आणी बसची समोरा समोर धडक...ट्रक चालक गंभीर जखमी......


बस मधील जखमींना नागभीड ग्रामीण रूग्नालयात केले दाखल.....सुदैवाने जिवीत हानी टळली...



 विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

नागभीड - नागपूर हायवेवर आज दि.१/९/२०२३ रोजी सकाळी ८:०० ते ८:३० वाजता च्या सुमारास बस आणि ट्रक दोघांमध्ये समोरा समोर टक्कर झाल्याने भिषण अपघात घडला आहे. घटनेची माहीती मीळताच नागभीड पोलिस घटना स्थळी दाखल झाली. 


ट्रक आणी समोरून येत असलेल्या महामंडळ च्या बस ची समोरा समोर धडक झाल्याने बस चालक व बस मधील अंदोजे १५ प्रवासी जखमी झाल्याची सुत्रांची माहीती आहे. तर जखमींना नागभीड ग्रामीण रूग्नालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.तर सदर अपघात इतका भिषण होता की सुदैवाने जिवीत हाणी टळली, सदर अपघातात ट्रक चालक स्टेरींग मध्ये अडकल्याने चालकाला काढण्यास अनेक अडथळे निर्माण झाले. नेमकी या अपघातात चुक कुनाची हे वृत्त लिहेपर्रंत स्पष्ट झाले नाही. 


ट्रक चालक गंभीर जखमी झाला असुन तब्बल एक ते दिडतास नागपूर नागभीड महामार्ग बंद होता.


मात्र नागभीड येथील वाहतुक यंत्रनेने युक्ती लढवीत शक्य असलेल्या अनेक लहान मोठ्या  वाहनांना नवखळा,डोंगर गाव, मार्गाने वळवील्याने महामार्गावर वाहतुकीची गर्दी निर्माण झाली नाही. घटनेचा अधीक तपास नागभीड चे  पोलिस निरीक्षक योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात नागभीड पोलिस करीत आहे.

 

सवीस्तर वृत्त लवकरच.......

Previous Post Next Post