Top News

Becoming an officer is a means of social service - Dr. Nareshchandra Kathole I will be an IAS Workshop....

अधिकारी बनणे हे सामाजिक सेवेचे साधन - डॉ. नरेशचंद्र काठोळे


मी होणार आयएएस कार्यशाळा.......



 विदर्भ माझा न्युज 24 -  कोरपना 


        सध्याच्या जगाची वाटचाल ही स्पर्धात्मक आहे.सारे जग स्पर्धेच्या दिशेने गतिमानतेने वाटचाल करीत आहे. अनेकविध स्वप्ने बाळगत तरुणाई स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.परंतू स्पर्धा परीक्षाची तयारी करीत असताना सामाजिक हिताचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. अधिकारीपद हे समाजसेवेचे महत्त्वाचे साधन असते, जनसेवेची उत्तम संधी असते,असे मत मिशन I.A.S. अकॅडमी अमरावतीचे  संचालक डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी केले.ते युग चेतना बहुउद्देशीय संस्थाद्वारा संचालित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. आजच्या युगातील विद्यार्थी हा प्रत्येक स्पर्धेसाठी तयार असून विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी त्यागाची तयारी ठेवायला हवी व सातत्यपूर्ण प्रयासातून हवे ते पद मिळवता अनुषंगित प्रतिष्ठाही लाभते असे मत त्यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी  नंदनवन ठरत आहे. स्पर्धा परीक्षा मे वातावरण निर्माण करण्याकरिता सकाळी शारीरिक कवायत, बौद्धिक कार्यक्रम, साप्ताहिक परीक्षा व मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत असल्याचने गेल्या दोन वर्षाच्या महाविद्यालयीन प्रगतीचा आलेख त्यांनी सर्व समोर ठेवला. 

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद मुसने, संजय ठावरी.प्रा. राहुल ठोंबरे,प्रा. मनीषा मरसकोल्हे,प्रा. रोशनी खाते,प्रा. सचिन पवार,प्रा. एजाज शेख, प्रा . राठोड उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा. राहुल ठोंबरे तर आभार प्रतीक मून यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



Previous Post Next Post