Top News

Finally, the identity of the deceased who was found hanged in Rajura was found....

अखेर राजुरा येथील गळफास घेतलेल्या अवस्थेत मीळालेल्या त्या मृतकाची ओळख पटली....




 विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 


 राजुरा शहरातील चेतन होटेल शेजारी विधाते यांचा पडक्या घरात गळफास घेऊन मिळालेल्या इसमाची ओळख पटवीन्यास राजुरा पोलीसांना यश मीळाले  आहे. 

सदर मृतकाची झळती घेतली असता मृतकाचा पॅन्टच्या खिशातून ओल्या व अस्पष्ट अवस्तेत आधार कार्ड मिळाले सदर आधार कार्ड वाचण्या योग्य नसल्याने आधार क्रमांकाची कशी - बशी ओळख करत आधार क्रमांकाने ऑनलाईन माहिती काढली असता मृतकाचे नाव विकेश गोविंदराव कोकाटे वय ३९ वर्ष राहनार शिवकृष्ण धाम मानकापुर, नागपूर अशी ओळख समोर आली आहे. 

    मृतक इसम नागपूर इथून राजुरा शहरात कुठे व कुनाकळे आला? हा प्रश्न अध्यापही तसाच आहे. मृतक राजुरा येथे किती दीवसापासुन राहत होता कुनाच्या घरी आला किव्हा कुना व्यावसायिका कळे काम करण्या करीता आला होता का? व तो  विधाते यांच्या घरी पोहचला कसा ? नागरीकांत चर्चेचा विषय आहे.

मृतकाचा मृतदेह मिळालेल्या ठिकाणचे छायाचित्र व नागपूर ते राजुराशी संबंध पाहता हत्या कि आत्महत्या अशी शंका वेक्त केली जात आहे.घटनेचा अधीक तपास राजुरा पोलीस निरीक्षक विशाल नागरगोजे  यांचा मार्गदर्शनात राजुरा पोलीस करीत आहे. 

Previous Post Next Post