उद्या घोडाझरी तलावात सिंदेवाही,नागभीड, ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो महिला व पुरुष करणार अर्ध जलसमाधी आंदोलन....
चिमुर अप्पर जिल्हाकार्यालयाला जनतेचा विरोध....जनतेत प्रचंड रोष.....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
नागभीड येथे नागभीड,ब्रम्हपूरी,सिंदेवाही येथील जिल्हा मागणी संघर्ष समितीची संयुक्त बैठक पार पडली यात सिंदेवाही,ब्रम्हपुरी येथील समितीचे संयोजक यांची उपस्थिती होती. यात सर्वांनुमते चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय क्षेत्रात जनतेची कुठल्याही हरकती न घेता समावेश केल्याबद्दल सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
तसेच सर्वांनुमते उद्या दिनांक 2 ऑगस्ट रोजी घोडाझरी तलावात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्याच्या निर्णय घेण्यात आला. 2019 साली चिमूर येथे अप्पर जिल्हा कार्यालयाची घोषणा केली तेव्हा जिल्हाधिकारी यांनी हरकती मागविल्या होत्या व त्याचा अहवाल शासनाला पाठविला होता मात्र त्यावर पुढे कोणतीही कारवाही करण्यात आली नाही त्या नंतर सरकारने ब्रम्हपुरी येथे अप्पर जिल्हा कार्यालय स्थापन करण्याचे पत्र काढले होते मात्र पुढे त्याचे काहीच झाले नाही.
गेल्या अनेक दिवसापासून सिंदेवाही,नागभीड, ब्रह्मपुरी येथे सात्यत्याने जिल्हा मागणी साठी आंदोलने केली जात आहेत मात्र असे असताना शासनाने तिन्ही तालुक्यातील जनतेचा कुठलाही विचार न करता 13 जुन रोजी चिमुर येथे अप्पर जिल्हा कार्यालय निर्मिती करण्याची घोषणा केली, नागभीड,ब्रह्मपुरी, सिंदेवाही येथील जनतेला चिमूर हे दळण वळणाच्या दृष्टीने सोयीचे नसल्याने त्यामुळे याला विरोध म्हणून अनेक आंदोलने केली अनेक अधिकारी व पदाधिकारी यांना निवेदने दिली तरी मात्र अजून कुठल्याही प्रकारचे अपेक्षीत उत्तर आले नसल्याने व सरकारने त्याची दखल न घेतल्याने आज तिन्ही तालुक्यातील जनता ही एकवटली असून सरकारच्या या कृतीचा निषेध म्हणून घोडाझरी तलावात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला.

