चंद्रपूर येथुन मृतदेह घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या अपघातात दुसऱ्याचाच मृत्यु......छत्तीसगड राज्यात नेण्यात येत होता मृतदेह.....
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
चंद्रपूर येथुन मृत्यु देह घेऊन छत्तीसगड ला जानार्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रन सुटल्याने एकाचा जागीच मृत्यु झाला तर एक जन गंभीर जखमी झाला आहे. जखमीला रुग्नालयत दाखल करण्यात आले आहे.
सवीस्तर वृत्त असे आहे की चंद्रपूर येथुन छत्तीसगड राज्यात एका इसमाचा शव विच्छेदन केलेला मृतदेह नेणाऱ्या MH-34 BF - 0050 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाचा मुल जवळील जानाळा गावालगत असलेल्या नाल्याच्या पुलाला धडकल्याने वाहनातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास घडली आहे.
मीळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन लहान रपट्याच्या पुलाला धडकले. ही धडक इतकी जोरदार होती की वाहनातील एका इसमाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक इसम गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती कळताच मुल पोलीस घटनास्थळी पोहचले असुन त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने जखमी इसमाला वाहनातून बाहेर काढले व त्याला पुढील उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले आहे.


