रोहीत लोनारे विराआंस युवा आघाडी शहर अध्यक्ष यांनी वार्डातील विविद्ध समस्ये बाबद दिले मुख्याधीकार्यांना निवेदन.....
बल्हारशाह शहरातील किल्ला वार्ड व गांधी मधील नागरीक त्रस्त.....
निवेदन देताच यंत्रना लागली कामाला....
स्वता वार्डात समस्येची पाहनी करण्यास येण्यार असल्याचे मुख्याधीकार्यांनी दिले विराआंस,युवा आघाडी ला आश्वासन....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह शहरातील विवीध समस्येला घेऊन दि.२८ / ऑगस्ट / २०२३ रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी चे तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या मार्गदर्शनात शहर अध्यक्ष रोहीत लोनारे यांनी प्रभागातील स्थानीकान सोबत मुख्यधीकारी नगर परीषद बल्हारशाह यांची भेट घेऊन सवीस्तर चर्चा केली व प्रभागातील समस्ये बाबद निवेदन दीले.
सवीस्तर वृत्त असे आहे की, बल्हारशाह शहरातील कील्ला वार्ड व गांधी वार्ड येथील रसत्यांची दुरावस्था झाली आहे. रसत्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे नेमक कळचत नाही. स्थानीक नगर सेवकाला स्थानीकांनी माहीती देऊनही नगर सेवकाने दोळे झाक पना केल्याचा आरोप स्थानीकांनी केला आहे. सदर प्रभागात रसत्याची मोठी समस्या उदभवली आहे. खड्यांनमुळे जेष्ठ नागरीकांना चालने अवखड होत आहे. अनेक दा जेष्ठ नागरीक खड्यांनमुळे तोल गेल्याने खाली पडुन इजा झाली आहे. त्या मूळे कील्ला वार्ड व गांधी वार्ड येथे नव्या रसत्याचे बांधकाम होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच नळाची जुनी पाईप लाईन लिक असल्याने जागो जागी पाणी वाहत असल्याने शेवाळ जमा होऊन अनेक नागरीक तिथे घसरुन पडल्याने अनेकांना इजा झाल्याच्या घटना ही वार्डात घडत आहे.
या परीसरात जेष्ठ नागरीक सकाळ सायंकाळच्या सुमारास तथा दुपारी सुद्धा भावल्या वेळात गोळा होतात त्यांना बसाची निट सोय सुद्धा नगर सेवकानी करून ठेवली नसल्याची खंत या निवेदनात नमुद केली आहे. या बाबद सुद्धा नागरीकांनी नगर सेवकाला माहीती दिली होती मात्र त्यांनी वार्डातील समस्ये कळे सर्रास दुर्लक्ष केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
प्रभागातील अनेक समस्ये कळे नगरसेवकाच्या दुर्लक्षते मुळे स्थानीकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे देखील या निवेदनात विदर्भ राज्य आंदोलन समिती ने आरोप केले आहे. सदर परीसरात जेष्ठ नागरीकांना बसण्या करीता खुर्ची ची व्यवस्था करून सदर परीसरात सौदर्यकरन, नवे रस्ते त्याच बरोबर नळाची लिकीज पाईपलाईन दुरुस्त करणे या समस्येचे लवकरात लवकर निराकरन करण्यात यावे. सदर मागणी लवकरात लवकर पुर्ण न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समीती,युवा आघाडी च्या वतीने नगर परीषदे विरोधात स्थानीक नागरीक व जेष्ठ नागरीकांसह उपोषनाला बसु असे रोहीत लोनारे यांनी नगर परीषदेला इशारा दिला आहे.
तर नगर परीषदेच्या मुख्याधीकार्यांनी लगेच यंत्रना कामाला लावली असुन समस्येची पाहनी करण्यात आली आहे. व लवकरच सर्व समस्येवर कार्य करू, मी यणार्या आठवड्यात स्वता प्रभागात पाहणी करण्यास येनार असल्याच ही मुख्याधीकारी विशाल वाघ यांनी विदर्भ राज्य आंदोलन समातीच्या शिष्ट मंडळाला आश्वासन दिली आहे.
या वेळी निवेदन देतांना शहर अध्यक्ष रोहीत लोनारे, दिक्षांत जगताप, निश्चय जगताप, अमन कासोटे , श्रीकांत कांबळे, प्रनित गोरघाटे, साहिल करमरकर, मेघा कोल्हे, माया करमनकर, मंगला करमनकर, नमिता वाळके, सविता करमनकर, अपेक्षा गावंडे, सरोज मावशी सह असंख्य विदर्भवादी कार्यकर्ते व प्रभागातील स्थानी उपस्थीत होते.




