Top News

Panjrepar village in Chimur taluka is surrounded by flood, loss of agriculture, food grains etc.

चिमुर तालुक्यातील पांझरेपार गावाला पुराचा वेढा शेती, अन्न धान्य आदींचे नुकसान.....

 विदर्भ माझा न्युज 24 - चिमूर 


चिमूर तालुक्यात दोन -तीन दिवसापासून सत्तत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शंखपूर जवळचे डोमा पांझरेपार आणि अन्य गावात पुर परिस्तिथी निर्माण झाली. यात पांझरेपार गावाला पुराणे वेळले, पुराचे पाणी अनेकाचा घरात शिरल्याने गावकऱ्यांचा घराचे तसेच शेतीचे मोठे नुकसान होऊन जन - जीवन विस्कळीत झाले अहे. रविवार ला 16 जुलै पूर ओसरू लागला आहे, मात्र सततचा मुसळधार पावसमुळे समोर पूर परिस्तिथी निर्माण होऊ शकते आणि हाहाकार माजू शकतो, त्यामुळे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. सकाळीच पूर परिस्थिती प्रत्येक्षात बघण्याकरिता भाजपचे चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार भांगडीया व विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच चिमूर विधानसभा चे काँग्रेस समन्वय सतिश वर्जुरकर पोहचून प्रशासनाला नुकसान भरपाईचे पंचनामे करून सादर करावे असे निर्देश प्रशासकीय अधिकाराना देण्यात आले.

Previous Post Next Post