Top News

Big News_Incident of shooting in Balharshah city was avoided....famous businessman Digwa brothers were attacked....

Big News_बल्हारशाह शहरात गोळीबारीची घटना टळली......प्रसिद्ध व्यवसाईक दिगवा बंधूंवर झाला हल्ला....




 विदर्भ माझा न्युज 24 - बलहारशाह 

  बल्हारशाह शहरातील प्रख्यात शशी डेवलपर्स आणि प्रॉपर्टी डीलर दिगवा बंधू हे गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास गोल पुलियाजवळ ओळखीच्या नायडू यांच्याशी बोलण्यासाठी थांबले असताना एका दुचाकीवरून मुखवटाधारी (चेहऱ्यावर स्कार्फ बांधून) तीन अज्ञात  व्यक्तीने अश्लील शिवीगाळ करत कमरेतून बंदुकी सारखी वस्तू काद्ध्तानाछे  पाहून  मनमोहन सिंग गुरुदयाल सिंग दिगवा आणि त्रिलोकचंद्र सिंग दिगवा यांनी बुलेट मोटरसायकलचा वेग वाढवून तेथून पळ काढला.

  अज्ञात युवकांनी महात्मा गांधी पुतळ्या पर्यंत  दुचाकीवरून पाठलाग करून पुन्हा गोळी मारण्याची धमकी दिली, या घटनेने परिसरात  काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले, बल्हारशाह पोलीस स्टेशन मध्ये सदर घटनेची  तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  असाच प्रकार विरूर येथे १ जुलै रोजी घडला होता, त्यानंतर या घटनेची नोंद विरूर पोलीसस्टेशन मध्ये दिल्यानंतर दिगवा  बांधवांना विरूर पोलीस स्टेशन च्या  पोलीस निरीक्षकांच्या मदतीने राजुरा पर्यंत पोलीस संरक्षणात पाठविण्यात आले होते,  दि. 13 जुलै ला रात्यारी  घटनेची पुनरावृत्ती झाली आहे, अज्ञात शत्रूच्या या प्रकारामुळे संपूर्ण दिगवा कुटुंब दहशतीत आले आहे, बल्हारशाह पोलीस सीसीटीव्ही फुटेज ची पालताळणी करीत आहे, मात्र मुखवटाधारी व्यक्तींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अद्याप यश आले  नाह.

   अशा परिस्थितीत देगवा कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनाला सुरक्षा पुरवण्याची विनंती केली आहे, तर बल्हारशाह पोलिसांन  कोणत्याही व्यक्तीशी मतभेद नसल्याची माहिती देगवा कुटुंबीयांनी दिली आहे.

Previous Post Next Post