Top News

Agriculture Sanjeevani program ceremony concluded at Mauja Nimani.....

 मौजा निमणी येथे कृषी संजीवनी कार्यक्रम सोहळा संपन्न.....


 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपणा 



 कोरपणा तालुक्यातील निमणी येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमात "कृषी पीक तंत्रज्ञान प्रसार दिन"  साजरा करण्यात आला सोयाबीन कापूस तूर या पिकाबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. Pemfe    योजना ,पिक विमा योजना, सोयाबीन पिकातील आठ सूत्री बीज प्रक्रिया लागवड पद्धतीने दिवाने उगवण क्षमता चाचणी घेण्यात  आली.या सर्व योजनेबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात कृषी पीक तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया उगवण क्षमता चाचणी ,सोयाबीन टोकन पद्धत, सारी वरबा पद्धत ,इ के वाय सी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. 

तसेच सोयाबीन कापूस तूर या पिकांना वीज प्रक्रिया केल्याने पिकावर येणारे नुकसान कमी होतात सोयाबीनवर येणारा चक्रीभुगा ,खोड कीड, मररोग, तुर पिकावर येणारे मुळावर येणारी बुरशी त्यामुळे तुरीचे पीक उभवल्या जाते त्यामुळे तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशाप्रकारे कृषी अधिकाऱ्यामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.,

त्यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे, अध्यक्ष अतुल धोटे सरपंच ,ग्रामपंचायत निमणी, मंडल कृषी अधिकारी कोरपना, मिलिंद ढोणे  ,डी बी भगत कृषी सहाययक बाखर्डी ,अंबुजा फाउंडेशन चे शंकर आत्राम, कृषी मित्र रणजीत गोरकार व गावातील समस्त शेतकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post