Top News

Narayan Hivarkar BJP taluka president's birthday is celebrated with great enthusiasm on behalf of Sakhi Mahila Sabhat Group.....

सखी महिला बचत गटाच्या वतीने नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.....



विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना



कन्हाळगाव येथील सखी महिला बचत गटाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण हिवरकर प्रमुख उपस्थिती अनिता केराम बचत गटाच्या अध्यक्षा, शील्पा वाघाडे सचिव, गोंडीनबाई वाघाडे, विमलबाई मडावी, वैशाली खंडाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 सखी महिला बचत गटाच्या अध्यक्षा अनिता  केराम यांनी तालुका अध्यक्ष  नारायण हिवरकर यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व केक कापून वाढदिवसाच्या  शुभेच्छा दिल्या



तसेच इतर महिलांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शुभेच्छा देऊन वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमाला सखी महिला बचत गटाचे पदाधिकारी महिला पुरुष,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post