Top News

The wire of that theft has been connected with Chandrapur.......big action of local crime branch........

त्या चोरीची तार चंद्रपूरशी जोडली गेली आहे.......स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई....



 विदर्भ माझा न्युज 24 - मुल  


दि. 16/04/2023 व 17/04/2023 ला रात्रो दरम्यान भेजगाव ता. मुल येथे आखिल गांगरेड्डीवार यांचे मालकीचे दारू भट्टीतुन 21 पेटी बियर कॅन चे बॉक्स, 1 पेटी देशी दारू, तसेच काउंटरमध्ये ठेवलेले नगदी 2700 रू व देवघरातील नगदी 1500 रू असा एकुण 84,395/- रू चा मुद्देमाल चोरी झाल्याने पो.स्टे मुल येथे अप.क्र. 147/23 कलम 461,380 भादंवी चा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचा स्थानीक गुन्हे शाखेने चंद्रपुर हे समांतर तपास करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, चंद्रपुर शहर बंगाली कॅम्प परीसरात राजीव गांधी नगर चंद्रपुर येथे राहणारे राकेश महतो याचे घरी चोरीची दारू लपवुन ठेवली आहे.

 अशा माहीती वरून राकेश महतो रा. राजीव गांधी नगर चंद्रपुर याचे घरी पंचासमक्ष स्थानीक गुन्हे शाखेने धाड ताकली असता राकेश महतो हा पोलीसांना पाहुन मोटरसायकलने पळुन गेला.  



नमुद ईसमाचे पत्नी पुजा महतो व पंचासमक्ष झडती घेतली असता बाथरूम मध्ये लपवुन ठेवलेला चोरीचा मुद्देमाल बियरचे 18 बॉक्स एकुण 54,000 रू चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. तसेच सदर दारू ही राकेश महतो, विनोद उर्फ विककी महतो व ईतर एक अनोळखी इसमाने आणुन ठेवल्याचे पुजा महतो सांगीतले.

पोस्टे मुल अप.क. 147/ 23 कलम 461,380 भादवीचा गुन्हा नमुद आरोपीकडुन उघडकीस करण्यात आला.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, पो.हवा. नितीन साळवे, पो.हवा. प्रकाश बलकी व पो.अ. मिलींद जांभुळे, सतिश बगमारे, मपोअं वाताका दिनेश अराडे यांनी केली.

Previous Post Next Post