Top News

Approval of Semi English medium at Zilla Parishad High School Kanhalgaon......

जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे सेमी इंग्रजी माध्यमाला मान्यता......


जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव शाळेला विविध सोई सुविधा मिळाल्या बद्दल महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी मानले.......



 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 



जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हाळगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वतंत्रकुमार शुक्ला मुख्याध्यापक प्रमुख पाहुणे पुष्पा सोयाम मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हाळगाव, डोहे,मडावी, जिवणे, जुनगरी, बोधाने,कु.अफसाना, भगत, मनवर, ताराबाई मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

  नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी सेमी इंग्रजी माध्यमाच्या बॅनर चे अनावरण करुन उद्घाटन केले तसेच डब्लु सि एल च्या वतीने सि एस आर फंडातून दोन विद्यार्थ्यांना झी व निट परीक्षेसाठी निवड नागपूर येथे दोन वर्षा साठी पाच लाख रुपये खर्चास मंजुरी मिळाल्याबद्दल नारायण हिवरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी कु, पवित्रा देवतळे व महेश चौधरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले,

 तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आपले मनोगत व्यक्त करतांना  नारायण हिवरकर यांनी जिल्हा परिषद हायस्कूल शाळेला महाराष्ट्र शासनाने वाचनालय,दाहा काम्पुटर,झी व निट मोफत शिक्षणासाठी दोन विद्यार्थ्यांची निवड झाली अशा अनेक  सोई सुविधा शाळेला मिळाल्या बद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार मानले व   स्वतंत्रकुमार शुक्ला मुख्याध्यापक यांच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी,नागरिक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन  जिवने  यांनी केले तर आभार जुनगरी यांनी मानले.

Previous Post Next Post