Top News

When the woman was in deep sleep at night, suddenly her house caught fire and the entire house was burnt to ashes..... Fortunately, no loss of life was avoided.

महिला रात्री गाढ झोपेत असतांना अचानक तिच्या घराला आग लागली आणी दोळ्या देखत संपूर्ण घर जळुन राख.....


सुदैवाने जिवीत हानी टळली....मात्र संसार उपयोगी साहित्य आगीत जळून खाक.‌‌.....


 विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी  


आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा लगत येत असलेल्या मौजा कृष्णानगर (केळझरा)येथील भुमीहिन विधवा महिला उषा कैलास जाधव,ही महिला रात्री गाढ झोपेत असताना अचानक तिच्या घराला आग लागुन संपूर्ण घर जळुन राख झाले,आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये या महिलेच्या घरातील संसार उपयोगी साहित्य सर्व जळून खाक झाले आहेत.

निसर्गाने दिलेलं अठरा विश्व दारिद्र्याची शिदोरी उराशी बाळगत संसारमय जिवन जगत असताना डोक्यावरील पतीचा छत्र हरवले,मुला बाळांच्या मायेच्या गर्दीत मातृत्व हिरावलेलं अशा अनेक भयान यातना सोसत आपलं एकटेपन जपत, उद्याच्या सायंकाळी धिराने आयुष्याची सुखमय वाटचाल करीत असतांनाच अचानकपने एका रात्रीत उषाने बगीतलेल्या सुखमय स्वप्नाचा काहीच क्षणात चुराडा झाला.

उन्हातान्हात शेतकऱ्याच्या शेतातील झालेला हंगाम मेंगींच्या शेतात कापुस वेचुन तीने तिच्या घरात जतन करुन ठेवलं होतं, एकदाच जतन केलेल्या मेंगी कापसाची जास्त भावाने विक्री होईल या आशेने उषाने कापुस विकला नाहीत,संपूर्ण पावसाळभर हाताला काम नसतात,मेंगि वेचुन कापसाच्या पैश्याची घरी गरज पावसाळ्यात असते पायी-पायी पैसा जमवत उदरनिर्वाहाचा गाडा तीथपर्यंत पोहोचवीला,पण क्षणात राख रांगोळी झाली विधवा महिलेला ओठलेल्या संकटाचा तीने एकटीने सामना का करावा यांना समाज बांधवाची महाराष्ट्र शासनाची धर्मदाय संस्थाची व लोकप्रतिनिधी या सर्वांनी या विधवा महिलेला मदतीचा हात पुढे करून मानवतेचे एकात्मतेचे दर्शन घडवावे अशी जनमान्यांकडुण अपेक्षा केली जात आहे.

Previous Post Next Post