Top News

A statement to the Chief Minister by the Farmers Farm Labor Elgar Parishad on behalf of the All India Gardeners Federation.

अखिल भारतीय माळी महासंघ मूल च्या वतीने शेतकरी शेत मजूर एल्गार परिषद तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन.......



 विदर्भ माझा न्युज 24 - मुल 



अखिल भारतीय माळी महासंघ तालुका मूल च्या वतीने शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेच्या माध्यमातून मान मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्याच्या संदर्भात निवेदन तहसीलदार मुल यांना शेकडो कार्यकर्त्यांच्या उपसास्थितीत देण्यात आले.

   शेतकरी शेतमजुरांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असून चंद्रपूर जिल्ह्यात सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे विविध समस्याने शेतकरी ग्रासून असून शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पनाचा स्तर अतिशय कमी झालेला आहे त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर आजू बाजूच्या राज्यांमध्ये मजुरी साठी जात आहेत या बाबींचा विचार करून मुल तालुका माळी महासंघाच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

   शेतकऱ्यांच्या बांध्या पर्यंत सिंचनाची सोय करावी....


अल्प भूधारक शेतकऱ्यांना धडक विहीर योजने अंतर्गत विहीर उपलब्ध करून द्यावी व बोरवेल मोटार पंप सहित विज 100% अनुदानावर उपलब्ध करून द्यावी, शेतीच्या मालाचे हमीभाव एप्रिल पूर्वीच जाहीर करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना हमीभावानुसार पिकाची लागवड करता येईल, शेतकऱ्यांना शेतामध्ये लागवड करण्यासाठी औषधी व मजुरांचा खर्च एकरी 10000 रु देण्यात यावा, प्रत्येक गावात शीतगृह व धान्य साठवण्यासाठी गोडाऊन ची व्यवस्था करण्यात यावी, शेतकरी आणि शेतमजूर दोघानाही पेन्शन योजना लागू करण्यात यावी, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत व्यक्तीस 1 कोटी रु नुकसान भरपाई व जखमी व्यक्तीस 25 लाख रु देण्यात यावी, अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना स्थायी पट्टे देण्यात यावे, घरकुलाची रक्कम सरसकट ग्रामीण व शहरी भागात 5 लाख  करण्यात यावी या व इतर मागण्याचे निवेदन तहसीलदार मूल याना देण्यात आले.

  निवेदन देताना अखिल भारतीय माळी महासंघ जिल्ह्याच्या नेत्या वर्षा  लोनबले, मूल तालुका प्रमुख ओमदेव मोहुर्ले, नंदू बारस्कर, ईश्वर लोणबले, जेष्ठ नेते डॉ पद्माकर लेनगुरे, गुरु चौधरी, डॉ गजानन चौधरी, गुलाब  शेंडे, हसन  वाढइ, वासुदेव गुरुनुले , मनोज मोहुर्ले, वासुदेव गुरुनुले, मारोती शेंडे, दौलत पाटील शेंडे, संजय चौधरी, प्रदीप  वाढई, चंदू चतारे, संदीप चिताडे, सुभाष सोनुले, ममता सोनुले, उषा शेंडे, माया शेंडे, रवींद्र चौधरी, अनिल निकेसर, राकेश मोहुर्ले, संदीप निकुरे, दिलीप वाढई, मुक्तेश्वर शेंडे, अरुण शेंडे, सत्यवान मोहुर्ले, रितेश मोहुर्ले, काशिनाथ शेंडे, विलास लेनगुरे, साईनाथ लोणबले, आनंदराव शेंडे, रत्नाकर शेंडे,श्रीरंग नागोसे, महादेव देवताडे, गणेश वाढई, नितेश मोहुर्ले, अनिल मंदाडे, व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post