राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का.....पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर नैताम यांनी पक्षाला ठोकला राम राम......
शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांच्या हस्ते शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश......
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
कोरपना तालुक्यातील कारवा गाव चे कोरपणा पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर नैताम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकत शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे.
शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांच्या हस्ते शेतकरी संघटनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाला कोरपना येथे जोरदार धक्का बसल्याची चर्चा आहे.
शेतकरी नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी संघटनेचा बिल्ला लावून शाल श्रीफळ देऊन सत्कार करीत मनोहर नैताम यांचा सत्कार केरीत प्रवेश करून घेतला.
या कार्यक्रमाला कोदेपूर गडचांदूर खोडशी बुद्रुक सेवा सहकारी संस्थेच्या सर्व नवनियुक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित
जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती निळकंठ राव कोरांगे, तालुका अध्यक्ष बंडू पाटील राजूरकर, तालुका अध्यक्ष अविनाश मुसळे, मदन पाटील सातपुते, गणपत पाटील काळे, भास्कर मते, पद्माकर मोहितकर, सुनीलराव बावणे, कडू पिंप शेंडे, गुड्डू काकडे, अनंता सह असंख्य शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्तीत होते.

