सावरगावच्या विकासची लगीन घाईतही सामाजीक बांधीलकी......
त्याने रक्तदान शिबिरातून केली लग्न मंडप विधिला सुरवात.....
विविध सामाजिक संदेश देणारी अशिही लग्नपत्रिका......
विदर्भ माझा न्युज 24 - सावरगाव
समाजातील काही तरूण सामाजिक दायीत्वाची जाणीव ठेवून कार्य करतात. असेच कार्य सावरगाव येथील विकास घनशाम बोरकर यांनी केले. स्वताच्या लग्नकार्याच्या विधीची सुरुवात त्याने रक्तदान शिबिराचे आतोजन करून केला. या वेळी अनेकांनी रक्तदान केले.
लग्नकार्यातून त्याने जपलेली सामाजीक जबाबदारीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. विकास बोरकर याने 5 वर्षापुर्वी "स्वप्नपूर्ती रक्तसेवा" या व्हाॅट्सअप ग्रुपची निर्मीती केली. स्वत: ॲडमिन राहुन विकासने ग्रुप मध्यील मित्रमंडळींसह अनेक सामाजीक उपक्रम सुरु केले.
रूग्न कुठलाही असो, रक्ताची गरज भासल्यास किंवा ग्रुपमध्ये रूग्णास रक्ताच्या गरजेचा संदेश आल्यास तो कधी स्वत: तर कधी मित्र समुदयाच्या माध्यमातुन थेट रूग्नालयात जाऊन रक्तदान करतो.
आज पर्यंत त्याने ३४ वेळा रक्तदान केले आहे. २६ मार्च २०२३ रोजी त्याचा विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला. दरम्यान,त्याने लग्न पत्रीकेत समाजहीताचे विविध संदेश छापुन समाजजाग्रुती करण्याचा प्रयत्न केला.
रवीवारी पार पडलेल्या मंडप विधीचा कार्यक्रमसुद्धा विकास ने रक्तदान शिबिर घेऊन सुरु केला. या रक्तदान शिबिरात मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या सह एकून ४५ रक्तक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. विकासचे हे कार्य समाजातील इतर तरूणांना नक्कीच प्रेरनादायी ठरणारे आहे.




