१५ दिवसात संपुर्ण रस्ता गेला उखडुन....रस्ता बनवीतांना ठेकेदारानी केला लाखोंचा भ्रष्ठाचार?....गावकर्यांचा आरोप.......
कन्हाळगाव पालेबारसा फाटा ते सामदा रोडला जोडणारा ६ कि.मी.लांबीचा डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे.....
विदर्भ माझा न्युज 24 - सिंदेवाही
प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही-सावली-ब्रम्हपुरी या तिन्ही तालुक्यांना जोडणारा मौजा कन्हाळगाव ता.सिंदेवाही येथील पालेबारसा फाटा ते सामदा रोडला जोडणारा ६ कि.मी.लांबीचा डांबरीकरण रस्ता बनविन्यात आला मात्र १५ दिवसांत संपूर्ण रोड उखडलेला आहे या मध्ये डांबर, आईल,चुरी यांचा योग्य वापर न करता सदर ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे रस्त्याचे काम केले आहे.
याबाबत स्थानीक गावकर्यांनी संबधित ठेकेदाराला विचारणा केली असता त्यांनी जर का रस्ता उखडेल तर त्या ठिकाणी ५ वर्षापर्यंत डागडुजी करून देऊ असे सांगितले. मात्र हा रस्ता खेड्या गावांतुन जात असुन सिंदेवाही-सावली-ब्रम्हपुरी या तिन तालुक्यांना जोडत आहे सदर रस्ता वरून ग्रामीन भागातील नागरी प्रवास करतील या गोष्टीचा फायदा घेत सदर ठेकेदार शासनाची दिशाभुल करत निकृष्ठ दर्जाचा रस्ता बाधला असुन सदर रस्ता निर्मीती मध्ये ठेकेदारानी लाखोचा भ्रष्ठाचार करीत निकृष्ठ दर्जाचा रस्ता निर्माण केला असल्याचा आरोप स्थानीक करत असुन यावर समस्त कन्हाळगाव ता.सिंदेवाही येथील रहिवाशीयांनी आक्रोश व्यक्त करत आपल्या व्यथा मांडल्या.
आमच्या चार पिढ्या गेल्या तरी आजपर्यंत कन्हाळगाव वासियांनी डांबरी रस्ता पाहीला नव्हता. परंतु कोणत्या तरी माध्यमातून हा डांबरीकरण रस्ता मंजूर होऊन यावर्षी कामसुद्धा करण्यात आला. परंतु काम पुर्ण झाल्या बरोबरच हा डांबरीकरण रस्ता ऊखडायला लागला आहे यामुळे हा रस्ता या मार्गावर राहील कि नाही? या डांबरी रस्त्याने ये - जा करता येईल कि नाही? असा प्रश्न कन्हाळगाव येथील जनतेला पडला आहे.
तसेच हा रस्ता ऊखडायला लागल्याबरोबर बाहेर निघालेली काळी गिट्टी व चुरी झाडून काढण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून करण्यात आला. जेणेकरून रस्ता पाहायला चांगला दिसेल, अशाप्रकारे या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून भ्रष्टाचार दिसुन येत असल्याचा आरोप सुद्धा गावकर्यांनी केला आहे.
या संपुर्ण भ्रष्ट कारभाराची शासन पसाही करून संबंधीत ठेकेदाराची पहानी करेलका व गावकर्यांना न्याय मीळतो की नाही ? या वर गावकर्यांचे लक्ष लागले आहे.

