कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते दिवंग्यांना धनादेशाचे वितरण......
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
राजुरा तालुक्यातील मौजा कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते दिवंग्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. ग्रामपंचायत कळमना अंतर्गत सुरेश चौधरी, एकनाथ भोयर, ज्ञानेश्वर ताजने, रवींद्र वाघाडे, नामदेव वसाके, मालाबाई दिघोरे या सर्व दिव्यांग गरजु बांधवांना जीवन जगत असताना त्यांना मदतीचा हात दिला, त्यांना चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं या उद्दिष्टाने शासनाने 15 वित्त आयोगातील पाच टक्के निधी हा दिव्यांग लोकांसाठी खर्च करावा हा निर्णय अतिशय लोकाभुमुक असून त्याचा फायदा हा दिव्यांना होतं आहे.
या प्रसंगी कळमनाचे सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की, दिव्यांग बांधवांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करता आली याचा मला आनंद आहे, मिळालेल्या मदतीमधून या सर्व बांधवांना थोडासा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी उपसरपंच कौशल्य कावळे, ग्रामपंचायत सदस्य दीपक झाडे, सुनिता उमाटे, रंजना पिंगे, प्रियंका गेडाम, ग्रामसेवक नारनवरे, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

