चंद्रपूर जिल्हा चालक पोलिस शिपाई लेखी परीक्षा २६ मार्च २०२३ रोजी.......
परीक्षेला २ तास अगोदर येण्याचे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सुचना......
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
चंद्रपूर जिल्हा चालक पोलिस शिपाई २०२१ साठी घेण्यात आलेल्या शारीरीक चाचणी तसेच कौशल्य चाचणी मध्ये विहीत गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व लेखी परीक्षा करीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक २६ मार्च २०२३ रोजी सकाळी ८:३० वाजता मातोश्री विद्यालय,चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे. #vidarbhmazanews24
लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. #vidarbhmazanews24
तसेच त्यांनी आवेदन अर्जात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस व्दारे कळवीण्यात येत असल्याची माहीती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया मार्फत एक पत्रा व्दारे कळवीण्यात आली आहे. #vidarbhmazanews24
लेखी परीक्षेसाठी उमेदवारांनी परिक्षा केंद्र (मातोश्री विद्यालय,ताडोबा रोड तुकूम चंद्रपूर) येथे २(दोन) तास अगोदर म्हणजे दिनांक २६/३/३/२०२३ रोजी सकाळी ०६:३० वाजे पर्यंत आवश्यक असल्याची माहीती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे. #vidarbhmazanews24
.jpg)