अहीर व धोटेचे मृत्यु देह चंदीगड मध्ये आढल्याने चंद्रपूर जिल्हात खळबळ..........
माजी केंद्रीय मंत्र्याच्या पुतण्यासह आणखी एका युवकाचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह.....
अहीर व धोटेची हत्या की आत्महत्या?
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
चंद्रपूर येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावाजलेले महेश अहिर व त्याचा मित्र हरीश धोटे ह्यांचे मृतदेह चंदिगड जवळील जंगलात आढळुन आल्याने खळबळ उडाली असुन हे दोन्ही मित्र मागील आठवड्यापासून कुणालाही न सांगता घरून निघून गेले होते. यासंदर्भात दोन्ही युवकांच्या कुटुंबीयांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महेश अहिर घरून निघून जाताना मोबाईल सह घरून मोठी रक्कम घेऊन गेला असल्याची माहिती मिळाली आहे.
![]() |
| #महेश_अहीर |
या दरम्यान चंदीगढ येथील सेक्टर ४३ मधील बसस्थानक (आयएसबीटी-४३) समोरील सेक्टर ५२ अंतर्गत येणाऱ्या कजेहडी गावाशेजारील जंगलात दोन युवकांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आले.
या घटनेची नोंद सेक्टर ३६ पोलीस ठाण्यात करण्यात आली आणि चंदीगढ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले. दोन्ही युवक स्थानिक हॉटेलमध्ये थांबले होते. तपासात दोन्ही युवक महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती चंदीगढ पोलिसांना मिळाली. त्यानंतर चंदीगढ पोलिसांनी बुधवारी चंद्रपूर पोलिसांशी संपर्क साधला.
दरम्यान, आढळून आलेले मृतदेह हे महेश अहिर आणि हरीश धोटे यांचे असल्याचे निष्पन्न झाले. चंदीगढ पोलिसांनी आत्महत्येचा प्राथमिक अंदाज वर्तवला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे बंधू हरिशचंद्र अहीर यांचा मुलगा महेश अहीर आणि त्याचा मित्र हरीश धोेटे या दोन तरुणांचे मृतदेह पंजाबची राजधानी चंदीगड येथील कजेहडी गावाजवळील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
या दोघांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वीच हंसराज अहिर ह्यांच्या बंधुंचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते, त्यापाठोपाठ त्यांच्या वडील बंधूच्या मुलाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने अहिर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


