Top News

Big announcement of Chandrapur Gadchirillo Travels Association..... 50 percent discount on tickets for women traveling with Travels from today.

चंद्रपूर गडचिरीलो ट्रॅव्हल्स असोसिएशन ची मोठी घोषना.....


आज पासुन ट्रॅव्हल्स ने प्रवास कराणार्या महीलांना टीकीट मध्ये 50 टक्के सुट.......


ट्रॅव्हल्सने प्रवास करणार्या महिलाकरिता तिकिटमध्ये 50 टक्के सवलत......



विदर्भ माझा न्युज 24 - मूल 



राज्यात नुकत्याच राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणार्या महिलांना 50 टक्के सवलत देण्याच्या शासनाच्या घोषणे नंतर आता विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली टॅव्हल्स असोशिएशननेही ट्रॅव्हल्सने प्रवास करणार्या महिलांना 50 टक्के प्रवासात सवलत देण्याची घोषणा केली आहे. तर गुढीपाडव्या पासुन सवलत योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याने महिलांनी सदर घोषणेचे स्वागत केले आहे.

महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणार्या महिलांसाठी 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करून त्याची अंलबजावणी सुरू केली आहे.

 शासनाच्या या घोषणेमूळे राज्य परीवहन महामंडळाच्या बस मध्ये महीलांची गर्दी वाढली आहे. एस.टी.बस मधील महीलांच्या वाढत्या गर्दीमूळे ट्रॅव्हल्स मधील प्रवाश्यांची गर्दी कमी होऊ लागल्याने व्यवसायावर संकट येण्याच्या भितीने चंद्रपूर गडचिरीलो ट्रॅव्हल्स असोसिएशनने ट्रॅव्हल्सने प्रवास करणार्या महिलांकरिता तिकिटमध्ये 50 टक्के प्रवास सवलत देण्याची घोषणा केली आहे.


चंद्रपूर गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या सदस्यांनी मुल शहरातील स्थानिक कन्नमवार सभागृहात झालेल्या बैठकीत चर्चा करून प्रवास सवलत देण्याचा जनहिताचा निर्णय घेतला असुन सदर निर्णयाची अंमलबजावणी आज गुढीपाडवा पासुन करण्यात आली आहे. महिलांनी ट्रॅव्हल्स मधील प्रवास सवलतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन केले आहे.

 यावेळी चंद्रपूर गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनचे चंदन पॉल, निखिल बोहरा, श्याम उराडे, विलास कागदेलवार, महेश जेंगठे, मार्तंड कापगते, साई गुंडोजवार, लुकेश अडपल्लीवार, मोहसीन खान, काजू खोब्रागडे, पप्पू पठाण, विजय चिलके, बालू चरडे, अभिजीत कावळे, दीपक महाडोळे आदी उपस्थित होते. चंद्रपूर गडचिरोली महामार्गाने खाजगी ट्रॅव्हल्स बसने प्रवास करतांना आता महीलांनाही 50 टक्के रक्कम द्यावी लागणार असल्याने महीलांनी समाधान व्यक्त केले असुन ट्रॅव्हल्स मालकांप्रती आभार व्यक्त केल्या जात आहे.

Previous Post Next Post