Top News

Adv. Vamanrao Chatap's attack on Shiv Sena... Shiv Sena, a Marathi-speaking party, has become three parties, so why shouldn't there be two Marathi-speaking states?

ॲड.वामनराव चटप यांचा शिवसेनेला खोचक टोला....शिवसेना या मराठी भाषिक  पक्षाचे तीन पक्ष झाले मग दोन मराठी भाषिक राज्य का होऊ नये ?


वेगळ्या विदर्भा शिवाय अवहेलना थांबणार नाही - ॲड.वामनराव चटप


आर्णी तालुक्यात विदर्भ निर्माण यात्रेचे जोरदार स्वागत.....



विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी 

विदर्भात विकासाच्या अनुशेष भरून काढण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडून तोच उपाय योजना होत नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकरी देश घडला देशो घडीला लागला कारण सिंचनाचा अनुशेष भरून काढणे कोणत्याही सरकारला जमले नाही. युवकासाठी रोजगार निर्मिती होत नाही त्यामुळे दरडोई उत्पन्न कमी होत आहे अशा कारणामुळे आपल्या विदर्भातील कुपोषण वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होत असताना शेतकऱ्यांना धड वीज मिळत नाही अशा प्रकारे जी हे सरकार कडून अवहेलना सुरू आहे ती वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय थांबणार नाही. असे रोखठोक प्रतिपादन ॲड. वामनराव चटक यांनी केले ते आणि येथील वेगळा विदर्भ समितीच्या विदर्भयात्रा या कार्यक्रमानिमित्त बोलत होते

बोलताना त्यांनी वेगळा विदर्भाची गरज का ही बाब पटवून सांगितली. यामध्ये वैज्ञानिक विकास महामंडळ निर्मिती ही 38 वर्षा नंतर झाली त्यामुळे 60 हजार कोटी विदर्भाला कमी मिळाले यामध्ये 67 वर्षात सिंचनाचा अनुशेष राहिला सिंचन प्रकल्प झाले नाही त्यामुळे शेतीही ओलीताखाली आली नाही परिणामी शेतकऱ्यांना आत्महत्या वाढल्या हा कलंक केवळ सरकारच्या नाक तेपणामुळे लागला.


आज नोकरीसाठी औद्योगिक क्षेत्र मुंबई पुणे नाशिक ठाणे या ठिकाणी आहे त्यामुळे विदर्भातील तरुणांना नोकरीसाठी त्या भागात जावे लागते. विदर्भातील नेते मंत्री झाले मुख्यमंत्री झाले परंतु औद्योगिक करण्यासाठी कोणतीही पुढाकार घेतला नाही वेगळा विदर्भाला विरोध करणाऱ्या शिवसेना या मराठी भाषिक  पक्षाचे तीन पक्ष झाले हे आपण पाहत आहे.

मग दोन मराठी भाषिक राज्य का होऊ नये असा खोचक टोलाही त्यांनी शिवसेनेला लावला हिवाळी अधिवेशन विदर्भातील 120 तालुक्यात एकही सिंचनाचे काम मंजूर झाले नाही. मंजूर झाले ते पश्चिम महाराष्ट्र साठीच हे सांगताना त्यांनी विदर्भातील तीनही मंत्राचा नाकतर्फे कोणासमोर आणला. आता वेगळा विदर्भाचा विचार केला नाही तर उद्या मुलांचे भवितव्य धोक्यात येणार आहे त्यामुळे लाटी खाऊ काठी खाऊ पण वेगळा विदर्भ घेऊ. विदर्भासाठी सामूहिक शपथ घेऊन निर्धार करून या सभेचा समारोह झाला यावेळी जेष्ठ पत्रकार प्रभाकर कोंबटवार चिंचली गुरुजी बाळासाहेब शिंदे बाळासाहेब गिरी प्रदीप वानखेडे रमेश मंगुळकर वैकुंठ राव मुंडे नाना माघाडे शिवाजी डाखोरे मनोहर पेंढार निलेश रामराव राकेश इंद्रपाल चौधरी सुनील मानकर नाना पाटील माकोडे गजानन जाधव अर्जुन राठोड प्रकाश भोसले यादी उपस्थित होते.

Previous Post Next Post