Top News

Free leadership will not work.....every office bearer and workers should participate in the booth campaign - Devrao Bhongle

फुकटची नेतेगीरी चालनार नाही.....प्रत्येक पदाधिकारी ते कार्यकर्त्यांनी बुथ अभियानात सहभागी व्हावे - देवराव भोंगळे 


भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने बुथ सहशक्ती करण अभियान अंतर्गत बैठक संपन्न......



विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 



भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने बालाजी सेलिब्रेशन मंगल कार्यालय गडचांदुर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीचे अध्यक्ष  देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर होते कार्यक्रमाचे उद्घाटक  गिरीश व्यास माझी आमदार नागपूर प्रमुख पाहुणे  खुशाल बोंडे लोकसभा निवडणूक विस्तारक चंद्रपूर, सुदर्शन निमकर माझी आमदार राजुरा, नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री चंद्रपूर , राजु घरोटे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष, नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, सतीश उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर तथा बुथ विस्तारक विधानसभा राजुरा, किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, शिवाजी सेलोकर जेष्ठ नेते, विजयालक्ष्मी डोहे महिला आघाडी जिल्हा महामंत्री, पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष, संजय मुसळे माझी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष, राम सेवक मोरे नगरसेवक, अरुण डोहे नगरसेवक, निलेश ताजने माझी नगरसेवक,आदी मान्यवर उपस्थित होते.

 जिल्हा अध्यक्ष  देवराव भोंगळे यांनी कोरपना तालुक्याचा आढावा घेतला बुथ सहशक्ती करण अभियान अंतर्गत सविस्तर माहिती दिली,लोक सभा प्रवास,बुथ विस्तारकांची निवड करण्यात आली,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मनकी बात कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्तेनी करावे याबद्दल माहिती दिली,पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी ते कार्यकर्त्यांनी बुथ अभियानात सहभागी व्हावे फुकटची नेतेगीरी चालनार नाही असे खडसावून सांगितले गिरीश व्यास माझी आमदार नागपूर यांनी प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,पदाधिकारी,कार्यकर्तेनी पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले तसेच  खुशाल बोंडे लोकसभा विस्तारक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले  सतीश  उपलंचिवार शहर अध्यक्ष तथा विधानसभा बुथ विस्तारक यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांनी केक भरवुन शाल, फळ,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तालुका अध्यक्ष  नारायण हिवरकर यांनी प्रास्ताविकात तालुक्याची सविस्तर माहिती दिली बैठकीला शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख, पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन नारायण हिवरकर यांनी केले तर आभार संदीप शेरखी यांनी मानले.

Previous Post Next Post