रोहन कळसकर यांची मानवाधिकार साहयता संघ भारत च्या बल्हारशाह शहर अध्यक्ष पदी निवड.......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह शहरातील सामाजिक कार्यकर्ते व युवा पत्रकार रोहन जयंत कळसकर हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनेच्या माध्यमातून बल्हारशाह शहरात सामाजिक कार्यात सक्रीय असतात तसेच यांनी कोरोणा महामारी च्या काळा मध्ये समाज कल्याण चंद्रपूर च्या माध्यमातून गडचांदुर येथील कोविड केअर सेंटर मध्ये काम करत असलेल्या काही कर्मचाऱ्याचे पगार होत नसल्याचे पाहून त्यांनी तात्काळ कोविड केअर सेंटर गंडचादुर येथील कर्मचाऱ्यांचे पगार मिळवुन देऊन त्यांना न्याय मिळवून दिलेला होता.
त्यामुळे रोहन जयंत कळसकर यांच्या कामगिरी बद्दल मानवाधिकार साहयता संघ भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोनु सिंग यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय प्रभारी तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवि धारणे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारशाह शहर अध्यक्ष म्हणून बल्हारशाह शहरातील सामाजिक कार्यकर्ते व युवा पत्रकार रोहन जयंत कळसकर यांची निवड करण्यात आलेली आहे.
यावेळी रोहन जयंत कळसकर यांनी मानवाधिकार साहयता संघ शाखा चंद्रपूर जिल्ह्याचा सर्व पदाधिकारी व वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार मानले व मी माझ्या बल्हारशाह शहर अध्यक्ष पद स्वीकारून व मिळालेल्या पदाचा कुठल्याही गैरवापर न होता त्याचा चांगल्याप्रकारे वापर करून गोर गरिब जनतेच्या न्याय व हक्का साठी सातत्याने लढणार व त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळवून देण्याचे काम नेहमी करत राहणार असे आश्वासन दिलेले आहे.तर मानवाधिकार साहयता संघ बल्हारशाह शहर अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल सर्व स्तरातुन रोहन कळसकर यांचे अभीनंदण केले जात आहे.
