Top News

Lack of amenities in Savli Sadoba Primary Health Center.....

सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोई-सुविधांचा अभाव.....


उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना व  नातेवाईकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात करावा लागतो अनेक समस्यांचा सामना........





विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी 


आर्णी तालुक्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून ओळख असलेल्या तथा आदिवासी बहूल असलेल्या सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील अनेक दिवसापासून सुविधांचा अभाव असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याची ओरड परिसरातील नागरिकाकडून ऐकायला मिळत आहे.

 या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या गोर_गरीब रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत,या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच औषधी साठा उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधी विकत घ्यावी लागत आहे, आरोग्यविषयक सोयी सुविधांचा अभाव असल्याने परिसरातील गरीब रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे, अन्न व औषध मंत्र्याच्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची अशी दयनिय अवस्था आहे.

दिनांक 23 फेब्रुवारी रोजी या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब कल्याण शिबिर घेण्यात आलेत,मात्र या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना व नातेवाईकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, येथील कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना उद्धट वागणूक मिळत असल्याने,नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

 स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सात महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची सोई सुविधा आढळून आलेली नाहीत, स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था झाली असून त्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाहीत,रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय नसल्याने शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना व तसेच नातेवाईकांना पाण्यासाठी बाहेरून पाणी विकत आणावे लागत आहे.

त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण परिसर अस्वच्छ असून,पंखे,लाईट नादुरुस्त असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.

Previous Post Next Post