कळमना येथे हळदी कुंकू आणि आनंद मेळाव्याचे आयोजन.....
राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे महिलांचे हळदी - कुंकू आणि जि. प ह उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन कळमनाचे सरपंच, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ महासचिव, ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सरपंच नंदकिशोर वाढई यांनी महिला ह्या समाज व्यवस्थेतल्या प्रमुख घटक असून समाज व्यवस्था बदलवण्याची ताकद त्यांच्यात आहे अशा कार्यक्रमांमधून सामाजिक स्नेहभाव निर्माण होतो तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित आनंद मेळावे हे सुध्दा अनेक दृष्टीने फायदेशीर असतात असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी सरपंच नंदकिशोर वाढई, उपसरपंच कौशल्य कावळे, ग्रा प सदस्य साईनाथ पिंपळसेंडे, सुनिता उमाटे, रंजना पिंगे, मुख्यधापक धानकुटे सर, पेदोर सर, गोखरे मॅडम, दुधे मॅडम, मिना भोयर, सुचीता धांडे, इंदिरा मेक्षाम, पार्वतीबाई वाढरे, सत्यशीला निमकर, सुमीता देवाळकर, सुनीता वाढई, पुष्पा बोडाले, कविता इददे, स्नेहल अस्वले, इंदिरा मेश्राम, मंगला शिरसागर, सारिका बोडाले, शितल गौरकर, अश्विनी निमकर, सपना मेश्राम, संगीता उमाटे, ज्योती वाढई, शुभांगी गौरकर, सीमा सिरसागर, रंजना अटकारे, मनीषा कावडे, प्रियंका बल्की, नीता पाल, संगीता कुकडे, गीता इददे, शारदा वांढरे, शीला मेश्राम, मंदा गेडाम, रंजीता भोयर, मनीषा धांडे, वंदना बलकी, मंजुषा अस्वले, अनिता वाढई, कर्मपूर अटकारे, वसंता चापले, अनिल मेश्राम, पांडुरंग शिरसागर, सुनील मेश्राम, मयूर गौरकर, समस्त गावकरी व समस्त महिला मंडळ उपस्थित होते.

