सर्वत्र खळबळ! काल सायंकाळी आकाशात दिसली रहस्यमय वस्तू; VIDEO पाहून तुम्हीही गोंधळाल.....
चंद्रपूर जिल्ह्या सह देशात अनेक ठीकानी पहायला मिळाले हे दृश्य.....
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
अवकाशात गुरुवारी सायंकाळी सात वाजता दिसलेल्या रहस्यमय वस्तूने चंद्रपूर जिल्हात खळबळ उडाली. मात्र, अवकाशातून गेलेली वस्तू ही उल्का किंवा धूमकेतू नव्हता, तर ते एक सॅटॅलाइट असल्याची माहिती खागोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.
काल गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अवकाशातून जणू रेल्वे धावत असल्याचे दुर्मिळ चित्र चंद्रपूर जिल्हातील नागरीकांना दिसले. या वस्तूमुळे जळगाव करांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला. लोकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी आकाशात हे सॅटलाईट पाहिल्यामुळे नागरिक गोंधळल्याचंही पाहायला मिळालं.
याबाबत अवकाश अभ्यासात सुरेश चोपणे यांना विचारले असता त्यांनी, अवकाशात आढळून आलेली वस्तू म्हणजे स्पेसएक्स ही कंपनी अवकाशात सोडलेले स्टार लिंक सॅटेलाइट असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, हे सॅटॅलाइट शुक्रवारी देखील रात्री आठ वाजता सुमारास दिसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.