Top News

Rajura - Kalamana bus resumed.....Success to the demand made by the students on the initiative of Sarpanch Nandkishore Gaddai.

राजुरा - कळमना बस पून्हा सुरू.....सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला यश. 




विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 


राजुरा तालुक्यातील मौजा कळमना हे गाव चंदनवाही बस स्टॉपवरून २ कि.मी. अंतरावर आहे. शासनाच्या मानव मिशन अंतर्गत कळमना येथे बस सेवा सुरू होती, मानव मिशन अंतर्गत योजनेच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील मुली शिकल्या पाहिजे, मुलींनी शिक्षणात प्रगती केली पाहिजे अशा शासनाच्या उदात्त हेतुने बस सेवा महाराष्ट्रात सुरू आहे परंतू कोरोना काळानंतर मौजा कळमना येथे ही बस सेवा बंद झाली, वारंवार मागणी व पाठपुरावा करून सुध्दा ही बस सेवा सुरू झाली नाही. त्यामुळे शेवटी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांनी कळमना येथे बस सेवा सुरू करावी, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये ही मागणी घेऊन दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी आगार व्यवस्थापक राजुरा यांना भेटले. बस सेवा सुरू न झाल्यास विद्यार्थी व पालकांना घेऊन आपण आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला होता. 

        त्यांच्या या मागणीची दखल घेऊन आगार व्यवस्थापक यांनी आजपासून कळमना येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनुसार राजुरा - पांढरपौणी - चंदणवाही - कळमना मार्गे बस सुरू केली आहे. यामुळे सरपंच नंदकिशोर वाढई आणि आगार व्यवस्थापकांचे सर्व विद्यार्थी, पालक वर्गाने आभार मानले आहेत.

Previous Post Next Post