Top News

Tourism study tour of All India Sarpanch Parishad starts from Chandrapur.....

अखिल भारतीय सरपंच परिषदेचा पर्यटन अभ्यास दौऱ्याला चंद्रपूर मधून सुरूवात.....



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 



आदर्श गावांची प्रेरणा घेऊन गावागावात सरपंचांनी ग्रामविकास साधावा या संकल्पनेतून अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वात राज्यातील आदर्श गावांच्या पर्यटन अभ्यास दौऱ्यास सुरुवात झाली आहे. सदर अभ्यास दोऱ्याचा पहिला मान चंद्रपूर सरपंच संघटनेला मिळालेला असून सरपंच संघटनेच्या वतीने राज्यातील आदर्श ग्राम पाटोदा, हिवरेबाजार, राळेगणसिद्धी सोबतच बारामती तालुक्यातील आदर्श गावांना भेटी देण्यात येणार आहे. सोबतच पुणे येथील जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग सचिन घाडगे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी सरपंचांना मिळणार आहे अशी माहिती उद्घाटन प्रसंगी राज्याचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी दिली. श्रीक्षेत्र आळंदी येथील राजेश मल्टीपर्पज सभागृह येथे सदर उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच संघटनेचे विदर्भ प्रमुख ॲड देवा पाचभाई, पुणे जिल्हा अध्यक्ष उज्वला गोकुळे, विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा. राजेंद्र कराडे, जिल्हा सचिव रत्नाकर चटप, ॲड. रुपेश ठाकरे, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष देविदास सातपुते, घरी जाऊन तालुकाध्यक्ष विनोद निखाडे, अनिता पिदुरकर, मुक्ता ठाकरे, अनिल ठीकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सदर सरपंच पर्यटन दौऱ्यामध्ये सरपंचांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन राज्यातील आदर्श गावाचा अभ्यास करावा चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे काम अतिशय चांगले असल्याचेही शशिकांत मोरे यांनी यावेळी सांगितले. सोबतच पंढरपूर पंचायत समिती यशोदा ट्रेनिंग सेंटर पुणे आधी ठिकाणाला भेटी देण्यात येणार आहे याची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातून झालेली असून महाराष्ट्रातील विविध ठिकाणांचा दौरा चंद्रपूर जिल्हा सरपंच परीषद करीत आहे. यामध्ये जिल्ह्यातील कोरपना, चिमूर, सिंदेवाही, वरोरा चंद्रपूर, गोंडपिंपरी तालुक्यातील 55 सरपंचांनी सहभाग घेतला आहे. सरपंच दोऱ्याचा पहिला मान चंद्रपूर जिल्ह्याला मिळाला हे आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. विदर्भातील अमरावती, गडचिरोली, यवतमाळ आदी जिल्ह्यातील पर्यटन दौरे याप्रमाणे आयोजित केली जाणार आहे आणि यातून सरपंचांना गावासाठी काम करण्याची नवीन प्रेरणा मिळणार आहे. सोबतच सरपंचाच्या समस्यांविषयी यातून चर्चा केली जाणार आहे. अॅड. देवा पाचभाई विदर्भ प्रमुख अखिल भारतीय सरपंच परिषद 11 फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात जिल्हास्तरीय सरपंच मेळावा सरपंच परिषदेचे संस्थापकअध्यक्ष जयंत पाटील राहणार उपस्थित. धनोजे कुणबी समाज संघटनेच्या वतीने चंद्रपूर येथे आयोजित कृषी प्रदर्शनी महोत्सवात जिल्हास्तरीय सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहे अशी माहिती सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, जिल्हाध्यक्ष प्रा. राजेंद्र कराडे यांनी दिले.

Previous Post Next Post