स्वतंत्र विदर्भ राज्या कीरीता एल्गार.....विदर्भवाद्यांमुळे तणाव....पोलिसांन सोबत झटापट.......
विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिली आत्मदहनाची चेतावनी........
वर्ष २०२३ संपे पर्यंत विदर्भ राज्याकरिता ‘करू किंवा मरू’ या घोषणेचा एल्गार विराआंसने केला.......
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
विदर्भ राज्य आंदोलन समितीने विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी यशवंत स्टेडीयम ते विधानभवन हे हल्ला-बोल आंदोलन यशस्वी करून मिशन २०२३ अंतर्गत विदर्भ राज्य निर्मितीकरीता “करू किंवा मरू” या घोषणेचा एल्गार करून डिसेंबर २०२३ पर्यंत विदर्भाचे स्वतंत्र राज्य याच देही याच डोळा मिळविण्याकरिता हल्ला-बोल आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या विदर्भवादी आंदोलकांनी योग्य वेळी जेल मध्ये जाण्याची व आंदोलनात हवे तेव्हा मरण्याची खुली संमती देऊन आंदोलनात राज्य मिळविण्याकरिता आवश्यक ती लढाई करण्याकरिता व आंदोलनात शहीद होण्याची शपथ घेऊन खुली संमती जाहीर केली आणि ११७ वर्षे सुरु असलेले विदर्भाचे स्वतंत्र राज्य मागणीचे आंदोलन ११८ व्या वर्षी (२०२३ संपेपर्यंत) कायम निकाली काढायचेच व राज्य मिळाल्यानंतर हि सर्व सूत्रे नव्या पिढीच्या हाती देण्याचा निर्धार जाहीर केला.
हेही वाचा 👉🏻 पत्रकाराचा वेगळ्या विदर्भाचा प्रश्न, उपमुख्यमंत्री फनवीस म्हणाले, ‘हेडलाइन’ बनऊ नका !
महाराष्ट्राचे राज्य गेल्या ६२ वर्षात आर्थिकदृष्ट्या कायमचे बुडालेले राज्य असून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहे राज्याचे २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे महसुली उत्पन्न ४ लाख ३ हजार कोटी असून राज्याला वर्षभराचा खर्च भागविण्याकरिता ४ कोटी २७ लाख कोटी रुपयांची गरज असून राज्याच्या अर्थसंकल्प २४ हजार ३५३ कोटी तुटीचा आहे. दुर्दैवाने राज्यावरील कर्जाचा, लायबिलिटीजचा व थकहमीचा बोझा ६ लाख ६ हजार कोटी रुपयांचा असून राज्याच्या तिजोरीत पैसेच नसल्यामुळे राज्याने राज्यातील राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्ग यासाठी शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याकरिता MSRDC ला ६५ हजार कोटी रुपयाचे कर्ज उभे करण्याचा व त्याकरिता राज्य सरकारची थकहमी देण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय केला आहे.
हेही वाचा 👉🏻 पत्रकाराचा वेगळ्या विदर्भाचा प्रश्न, उपमुख्यमंत्री फनवीस म्हणाले, ‘हेडलाइन’ बनऊ नका !
राज्य आर्थिक दृष्ट्या डबघाईस आल्याचे परिणाम म्हणजे राज्यात गेल्या ९ वर्षांपासून अनुकंपा तत्वाची नोकरभरती बंद असून गेल्या ८ वर्षांपासून वर्ग ३ व वर्ग ४ ची नोकरभरती बंद आहे. महाराष्ट्रातील सर्व मंडळे व महामंडळे यांच्या संचित घाट्यात दररोज वाढ होत आहे आणि ४ मे २०२० पासून सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग वगळता सर्व खात्याची नोकरभरती बंद आहे. सरकार काहीही सांगत असले तरी सुद्धा एकाही खात्यात नोकर्भार्त्ती झाली नाही व रिक्त जागा भरल्या गेल्या नाही. याउलट राज्यात मार्च २०२० पर्यंत बेरोजगारांची संख्या ४५ लाख होती व कोरोनाच्या काळात उद्योग व कंपन्या बुडाल्यामुळे जवळ जवळ २१ लाख नोकरदार बेरोजगार झाले असून बेरोजगारांची संख्या ६६ लाखावर गेली असून विदर्भातील बेरोजगारांची संख्या १४ लाखाच्या आसपास आहे. विदर्भ १०० वर्ष महाराष्ट्रात राहिला आणि ब्रम्हदेवाला जरी मुख्यमंत्री केले तरी विदर्भाचा सिंचन व इतर क्षेत्रातील ७५ हजार कोटींचा अनुशेष कदापीही भरून निघू शकत नाही परिणामी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सोशिओ-इकॉनॉमिक प्रश्न असलेला नक्षलवाद व बेरोजगारीचा प्रश्न तसेच प्रदूषण, कुपोषण त्यामुळे होणारे बालमृत्यू, गर्भार माता मृत्यू निकाली निघू शकत नाही म्हणून या सर्व प्रश्नाचे एकच उत्तर म्हणजे “स्वतंत्र विदर्भ राज्यच आहे.” हेही वाचा 👉🏻 पत्रकाराचा वेगळ्या विदर्भाचा प्रश्न, उपमुख्यमंत्री फनवीस म्हणाले, ‘हेडलाइन’ बनऊ नका !
आजच्या आंदोलनात एड. वामनराव चटप, प्रकाशभाऊ पोहरे, रंजनाताई मामर्डे, अरुण केदार, मुकेश मासुरकर, एड. मोरेश्वर टेंभूर्डे, डॉ. रमेशकुमार गजबे, उपेंद्र शेंडे (खोरीपा, मा.आ.), एड. मुकेश समर्थ (व्ही-कनेक्ट), एड. नीरज खांदेवाले (विराआ.), सुनील चोखारे (विचार मंच), अहमद कादर(नावीस), आचार्य संतोशानंद (पी.बी.ओ.आय.), मुन्ना महाजन (स्वा.प.), राजेश रंगारी (बी.आर.एस.पी.) सह सुधा पावडे, रेखा निमजे, सुनिता येरणे, तात्यासाहेब मत्ते, प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार, एड. सुरेश वानखेडे, तेजराव मुंढे, दामोधर शर्मा, प्रा. राम बारोटे, राजेंद्र आगरकर, सतीश प्रेमलवार, प्रकाश लढ्ढा, डॉ. विजय कुबडे, डॉ. विठ्ठल घाडगे, ओमप्रकाश तापडिया, नारायण विभूते, गजानन अमदाबादकर, प्रा. पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, कृष्णराव भोंगाडे, युवराज साळवे, किशोर दहेकर, कपिल इद्दे, सुदाम राठोड, अंकुश वाघमारे, प्रा. मोहितकर, सुधीर सातपुते, अरुण वासलवार, मनोहर गेडाम, राजेंद्रसिह ठाकूर, घीसू पाटील खुणे, नासीर जुम्मन शेख, सुरेश बारसागडे, सुरेश जोगळे, अरविंद तायडे, सतीश देशमुख, अशोक पाटील, अशोक दापोरकर, प्रदीप उबाळे पाटील, सुखदेव पात्रे, मनीषा फुंडे, देविदास लांजेवार, अतुल सतदेवे, वसंत गवळी, मधुसूदन हरणे, सतीश दाणी, शैलाताई देशपांडे, सचिन डाफे, ज्योती खांडेकर, जया चातुरकर, प्यारूभाई उर्फ नौशाद हुसैन, नरेश निमजे, वीणा भोयर, शोभा येवले, विजय मौदेकर, रामेश्वर मोहबे, श्रीकांत दौलतकर, ललित पवार, लक्ष्मन देंढवाल, अशोक पटले सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.



