Top News

68 heavy guns and 12 barrels of police were seized from the citizens of Gadchiroli district.

गडचिरोली जिल्हयातील नागरिकांकडुन 68 भरमार बंदुका व 12 बॅरल  पोलीसांच्या स्वाधिन......




 विदर्भ माझा न्युज 24 - गडचिरोली 

             मोठया प्रमाणावर जंगलक्षेत्र  असलेल्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यात,  पारंपारिक शेती व्यवसायासोबतच शिकार करण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांपासुन संरक्षणासाठी अनेक सामान्य नागरिक बंदुका बाळगत असतात. अशाच प्रकारच्या वडीलोपार्जित बंदुका व शस्त्रे गडचिरोली जिल्ह्रातील नागरिकांकडे उपलब्ध आहेत.  

नक्षलवादी याच बाबीचा फायदा घेवुन, सर्वसामान्य जनतेला नक्षल चळवळीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवितास धोका होवु नये याकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे संकल्पनेतुन नक्षलवाद्यांच्या पिएलजीए सप्ताहाच्या पाश्र्वभुमीवर नागरिकांनी स्वत:जवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने जवळच्या पोलीस स्टेशन येथे स्वाधिन कराव्यात असे आवाहन करण्यात आले होते.



            गडचिरोली पोलीस दलाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांनी त्यांचेकडे बाळगलेल्या 68 भरमार बंदुका व 12 बॅरल   पोलीस दलाच्या स्वाधिन केल्या असुन, उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत उपपोस्टे दामरंचा 20 भरमार, उपपोस्टे रेपनपल्ली 05 भरमार, पोस्टे जिमलगट्टा 02, उपविभाग अहेरी अंतर्गंत उपपोस्टे पेरमिली 15 भरमार व 03 बॅरल, पोस्टे मुलचेरा 02 भरमार, उपपोस्टे राजाराम (खां.) 12 भरमार व 9 बॅरल, उपविभाग पेंढरी कॅम्प कारवाफा अंतर्गत 08 भरमार, पोमके गोडलवाही 04 भरमार बंदुका पोलीसांचे स्वाधिन करण्यात आल्या.

#gadchirolipolice #antinaxal #wepans #surander

Previous Post Next Post