Top News

Journalist's separate Vidarbha question, Deputy Chief Minister Fadnvis said, don't make it a 'headline'!

पत्रकाराचा वेगळ्या विदर्भाचा प्रश्न, उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘हेडलाइन’ बनऊ नका !


पत्रकाराच्या प्रश्नाला बगल दिली, यावरुन देवेंद्र फडणवीस यांचे विदर्भावर खरे प्रेम किती, हे दिसून आले........

हे ही वाचा 👉🏻 विदर्भवाद्यांचा आज विधानभवनावर हल्लाबोल आंदोलन.......

विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर 

विदर्भाच्या विकासासंदर्भात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देण्यास टाळले. विदर्भाचा विकास होत नसेल तर वेगळ्या विदर्भा संदर्भात तुमची भूमिका काय असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना एका पत्रकाराने विचारला. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस गोंधळले, अन म्हणाले, तुम्ही’हेडलाइन’बनऊ नका, असे उत्तर देऊन प्रश्नाला बगल दिली. यावरुन देवेंद्र फडणवीस यांचे विदर्भावर  खरे प्रेम किती, हे दिसून आले.

हे ही वाचा 👉🏻 विदर्भवाद्यांचा आज विधानभवनावर हल्लाबोल आंदोलन.......

भाजप ने विदर्भासाठी आमगाव ते खामगाव यात्रा काढली होती. वेगळ्या विदर्भासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका मांडली होती. पण मुख्यमंत्री बनताच फडणवीस यांना वेगळ्या विदर्भाचा विसर पडला होता. आता केवळ फडणवीस विदर्भाच्या विकासा संदर्भात बोलतात. यावरुन भाजप यांना वेगळा विदर्भ नकोच हे स्पष्ट दिसते. म्हणूनच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला पत्रकारांना संबोधित करताना पत्रकाराने वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर’हेडलाइन’बनऊ नका, असे उत्तर दिले.

हे ही वाचा 👉🏻 विदर्भवाद्यांचा आज विधानभवनावर हल्लाबोल आंदोलन.......

Previous Post Next Post