पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देवुन "तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा" - हर्षल फदाट
विदर्भ माझा न्युज 24 - जालना
मागील अनेक दिवसांपासून जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा व विदर्भात प्रचंड पाऊस सुरू असून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास निसर्गाने हिरावून घेतला, पिकांचे पंचनामा न करता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी हर्षल पाटील यांनी केली.
अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकऱ्यांवर दयनीय परिस्थिती ओढावली आहे शेतमालाचे मोठे नुकसान झाले मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.करुन शेतकरी बांधवाला तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी हर्षल पाटील फदाट यांनी लावुन धरली आहे.
यावर्षी शेतकऱ्यांवर निसर्गाने संकट ओढवले आहे. विदर्भ, मराठावड्या आणि इतर भागातह अतिवृष्टी झाली, त्यात शेतकऱ्यांनी दिससरात्र राबून पिकविलेले उभे पीके वाया गेले. सोयाबीन, कपाशी, तुर, मका, बाजारी इत्यादी पिकांचं अतोनात नुकसान झाले आहे. फळबागा व पालेभाज्या याचेही मोठ्या प्रमाणावर या पावसाचा नुकसान झाले आहे. जोडधंदा असणाऱ्या पशुधनालाही याचा फटका बसला आहे. शेतकरी वर्गापुढे मोठं संकट उभं राहिलं आहे.
खरीप हंगामात काहीतरी पदरात पडेल अशी आशा शेतकऱ्याला होती परंतु परतीच्या पावसाने सोयाबीन,कपाशी,तुर, मक्का,बाजरी इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची उरली-सुरली स्वप्नही धुळीस मिसळली आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये .पंचनामे न करता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करुन,तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी व शेतकरी बांधवांची दिवाळी गोड करावी - हर्षल पाटील फदाट (शेतकरी पुत्र)
