Top News

खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे......खड्ड्यामुळे नागपूर औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर अपघात ला‌ निमंत्रण........

खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे......खड्ड्यामुळे नागपूर औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर अपघाताला‌ निमंत्रण........




 विदर्भ माझा न्युज 24 - धामनगाव रेल्वे 



 पावसामुळे नागपूर औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर पडलेले खड्डे वाहन चालवण्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत या खड्ड्यामुळे अपघात होत आहे.नागपूर औरंगाबाद एक्सप्रेस हायवे वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो या मार्गावर अवजड वाहने मोठ्या प्रमाणात चालतात परंतु या रस्त्यावर खूप खोल खड्डे झाले आहे,त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात वाढले आहे.



परिणामी अपघातात अनेकांचा जीव गेला असल्याची माहीती आहे, तसेच रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे कॉन्ट्रॅक्टदाराकडून डाग डूजी करण्यात येते परंतु थातुरामातुर कामे करण्यात येतात.

या रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होते व जीवितहानी टळावी आणि जनतेच्या जीवाशी खेळ बंद व्हाया या साठी उपाय योजना होने आवश्यक आहे,  नागपूर औरंगाबाद हा एक्सप्रेस हायवे मृत्यूचा सापळा ठरत आहे. या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. 

प्रशासनाने देखील याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. या रस्त्याची अद्याप वाईट परिस्थिती आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील भातकुली, रायपुर, बोरगाव धांदे, या गावाजवळ खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

Previous Post Next Post