चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलात कोसळले जीवित हानी टळली.....
सुरजागड एटापल्ली मार्गावर प्रत्येक गावात सुरक्षारक्षका ची नेमणूक केली आहे त्या धर्तीवर आष्टी ते बल्हारशाह मार्गावर प्रत्येक गावात सुरक्षारक्षक द्या - बंडु गौरकार
कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गणपूर ते आकसापूर च्या मध्ये भागी असलेल्या नाल्यामध्ये गोंडपीपरी कडून भरधाव वेगाने येत असलेले ट्रॅक क्रमांक एम एच ३३ डब्लू ५५५० च्या चालकाचे ट्रॅक वरून नियंत्रण सुटल्याने तो नाल्यामध्ये पलटी मारल्याची घटना काल दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी चालक मात्र फरार झाला आहे.
त्रेवेणी अर्थ मूव्हर्स प्रा. ली.सुरजगड येथ लोह प्रकल्प असल्याने येथून लोह खनिज मिश्रित असलेली गिट्टी बल्हारशाह,राजुरा ला मोठ्या प्रमाणात आणल्या जाते.अहेरी ते बल्हारशाह मार्गावर रोज शेकडो वाहनांची वर्दळ सुरू असते.वाहन चालक सुसाट वेगाने चालवीत असल्याने अपघात होऊन अनेकांचे बळी जाऊन सोबतच वित्तहानी पण झालेली आहे.
असाच प्रकार आज घडला असून लोह खनिज भरलेले १४ चाकी ट्रॅक नाल्यामध्ये पलटी मारल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे.वृत्त लिहिपर्यंत कोणताही गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशन ला झाली नव्हती.अपघात टाळ्न्या करीत कंपनी ने सुरजागड एटापल्ली मार्गावर प्रत्येक गावात सुरक्षारक्षका ची नेमणूक केली आहे त्या धर्तीवर आष्टी ते बल्हारशाह मार्गावर प्रत्येक गावात सुरक्षारक्षक देणंयाची मागणी भाजपा किसान सेलचे महामंत्री बंडू गौरकार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली आहे.

