Top News

विदर्भ राज्य आंदोलन समिति बल्लारशाह तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तर शहर अध्यक्ष राहीत लोनारे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सपन्न.

विदर्भ राज्य आंदोलन समिति बल्लारशाह तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तर शहर अध्यक्ष राहीत लोनारे यांच्या  नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सपन्न. 




 विज ग्राहकांनो, विज कनेक्शन कापू देवू नका,सामुहीक विरोध करा - पराग गुंडेवार तालुका अध्यक्ष.


विज कनेक्शन कापण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्या.


 कोरोना काळातील विज बिल सरकारने भरावे.




(विदर्भ माझा न्युज 24 - संपादक)संजय घुगलोत,बल्लारशाह,जि.चांदा :-   दि. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे विदर्भ भर धरने व ठिय्या आंदोलन करण्यात आले, बल्लारशाह तालुक्यात सुद्धा  तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार ,तालुका उपाध्यक्ष संजय घुगलोत यांच्या मार्गदर्शनाखाली तर शहर अध्यक्ष रोहित लोनारे यांच्या नेतृत्वाखाली व तालुका सचिव गौतम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थीतीत नगर परिषद चौक, बल्लारशाह येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.


आंदोलनातील प्रमुख मागन्या म्हणजे, विज महावितरण कंपनी ने जे सामान्य नागरिकांना विज कनेक्शन कापण्याचे दीलेल्या नोटीस चा निषेध,  आदरणीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्रणि संग्रहालय नागपुर ला देण्याचा विरोधात शासनाचा निषेध, अमरावती सरकारी मेडिकल कॉलेजचा जो निधी पळवण्यात आला तो लवकरात लवकर मिळवुन देण्यासाठी व या सर्वांचा एकच उपाय ते म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावा या प्रमुख मागण्यांना घेऊन निदर्शने व ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या वेळी शहर सचिव संदीप केशकर, शहर संघटक अविनाश गायकवाड, विभाग अध्यक्ष राकेश बहुरीया, विभाग उपाध्यक्ष कुशाल बहुरिया,विभाग सचिव राजेश बहुरिया, विभाग कोषाध्यक्ष प्रतिक  माटे,  रविकांत खेंगर, श्रीनू अंगूरी, सह असंख्य विदर्भवादी उपस्थित होते.

Previous Post Next Post