Top News

इको-प्रो ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रम अंतर्गत गोंडराजे बिरशहाराजे यांच्या समाधीवर पुष्पअर्पण.

 इको-प्रो ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रम अंतर्गत गोंडराजे बिरशहाराजे यांच्या समाधीवर पुष्पअर्पण.


युवकांनी आदर्श घेण्याची गरज - बंडु धोतरे अध्यक्ष इको-प्रो


 शहरातील प्रेमाचे प्रतिक असलेल्या वास्तुवर पुष्पअर्पण




(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य उपसंपादक)रोहीत लोनारे,चांदा(चंद्रपूर):- शहरात गोंडकालिन ऐतिहासिक वास्तु असलेली गोंडराजे बिरशहाराजे व राणी हिराई यांच्या समाधीवर ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रम अंतर्गत इको-प्रो संस्थेचे सदस्य यांनी पुष्पअर्पण करून कार्यक्रम साजरा केला.

आजच्या युवकांना प्रेमदिनाच्या निमीत्ताने क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, प्रत्येक नात्यातील प्रेम वृध्दीगंत करण्याकरिता विशीष्ट दिवसाची गरज नसुन, पाच्छिमात्याचे अनुकरण न करता विद्यार्थ्यांना योग्य संदेश देता यावा म्हणुन दरवर्षी गोंडराजे बिरशहाराजे आत्राम यांचे समाधी स्थळावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा मात्र कोविड मुळे विदयार्थ्यांना सहभागी करून घेता आले नाही.

  राणी हिराईने गोंडराजे बिरशहाराजे आत्राम यांची समाधी त्यांच्या मृत्युनंतर या वास्तुचे सुंदर असे बांधकाम केले होते. ताजमहलच्या नंतर त्याच तोडीची गोंडवनातील सुंदर आकर्षक अशी वास्तु बांधुन न थांबता गोंडराजे बिरशहाराजे आत्राम यांच्या मृत्यु नंतर राज्यकारभार योग्य रित्या सांभाळत अनेक विकासकामे चांदा गोंडराज्यात केलेली आहेत. अनेक मंदीराचा जिर्णोध्दार सुध्दा केलेला आहे, राणी हिराई आत्रामा यांच्या कार्यकाळ चंद्रपूरच्या इतीहासात नोंदवीला गेलेला आहे. राणी हिराई आत्राम यांनी आपल्या कार्यातुन आपल्या पती प्रती असलेले प्रेम अजरामर केले आहे. राणी हिराई यांचा हा आदर्श आजच्या युवकांनी-युवतीनी घेण्याची गरज आहे.

चंद्रपूर शहरात असलेली ही प्राचीन पुरातन वास्तु खऱ्या अर्थाने आपला वारसा संवर्धनाचा तसेच आपल्या कार्यातुन गोंडराजे बिरशहाराजे आत्राम व राणी हिराई आत्राम यांच्या तील प्रेम अजरामर करून ताजमहलच्या तोडीची वास्तु निर्माण सोबतच पुढील काळात योग्य राजकारभार करून राणीने एक आदर्श घालुन दिलेला आहे. राणी हिराई आत्राम आणि गोंडराजे बिरशहाराजे आत्राम यांच्यातील प्रेमचं होत की जे मृत्यु नंतरही अजरामर झाले आहे, त्याच्या कार्यातुन ते सतत जिवंत राहणार आहे. आजच्या दाम्पत्यांनी तसेच युवकांनी अशा स्थळांना, स्मारंकाना भेट देत आपल्या जिवनात, हा आदर्श घेण्याची गरज आहे, ऐतिहासिक वास्तू संवर्धन करिता पुढाकार घेण्याची गरज आहे असे मत यावेळी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी व्यक्त केले. 

आज संपन्न झालेल्या सलाम राणी हीराई कार्यक्रम करिता इको-प्रो चे नितीन रामटेके, संजय सब्बनवार, सुनील पाटील, सुधीर देव, जयेश बैनलवार, मनीष गावंडे, कपील चौधरी, अमोल उटटलवार, पूजा गहुकर, दुर्गेश्वरी वायकर, सारिका वाकुडकर पुरातत्व विभाग चे कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post