रिसोड तालुक्यातील अपूर्ण असलेल्या सुव्यवस्था नसलेल्या स्मशानभूमीचे काम तात्काळ पूर्ण करा - गोपाल भिसडे पाटील
विदर्भ माझा न्युज 24 - वाशिम
वाशिम जिल्हातील रिसोड तालुक्यात बऱ्याच स्मशानभूमीचे अर्धवट बांधकाम आहे, काही खेडोपाडी जाण्या लायक सुद्धा स्मशान भूमी नाही, अशी गावकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेत, त्वरित रखडलेल्या स्मशानभूमीचे काम चालू करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांनी गटविकास अधिकारी रिसोड यांना केली आहे.
कोयाळी (बु )रि.यांच्यावतीने मागील दोन वर्षापासून बौद्ध वस्तीतील स्मशानभूमीचे अर्धवट बांधकाम रखडलेले आहे. मौजे आसेगाव (पेन) इथे सुद्धा स्मशानभूमीची अवस्था संपूर्ण खड्डे चिखल व जिकडे तिकडे गवत सगळीकडे घाण असे वातावरण झाले आहे, रा.पेडगाव तालुका रिसोड येथील स्मशानभूमीचे काम सुद्धा ग्रामपंचायत च्या बेजबाबदारपणामुळे जसेच्या तसे आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत अशा स्थितीत एखादा व्यक्तीमृत पावला तर शैव जाळायचे कुठे असा प्रश्न तालुका वाशीय लोकांच्या मनात निर्माण होत आहे, निधी उपलब्ध असतानाही कामे होत नाहीत?अशा बऱ्याच अडचणी समस्या घेऊन लवकरात लवकर स्मशान भूमीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी निवेदन अर्ज देऊन सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांनी किली आहे.
