उद्या बेलदार समाजाचा वर्धा येथे संगीता ला न्याय मिळवून देण्यासाठी विशाल मोर्चा.....
विदर्भ माझा न्युज 24 - वर्धा
बेलदार भटका समाज संघटना महाराष्ट्र राज्य, विदर्भ बेलदार व तत्सम समाज संघटना जिल्हा शाखा वर्धा व अखिल भारतीय विमुक्त जाती, भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या समर्थनाने बेलदार समाजाच्या व विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजाचे विविध संघटांनी एकत्र येऊन कू. संगीता हिम्मत मोहिते राहणार तळेगाव (टालेटूला) जिल्हा वर्धा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाना कडक शिक्षा करून कूं. संगिता मोहिते ला न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी वर्धा, पोलिस अधिक्षक वर्धा यांना निवेदन देण्यासाठी दिनांक २२.९.२०२२ रोज गुरुवार ला दुपारी १२.०० वाजता तानेलवार हॉल अँड लान बोरगाव मेघे फ्फर्मसी कॉलेज समोर हिंगणघाट रोड वर्धा शहर येथे सभा गृहात निषेध सभा आटोपून शहरातील मुख्यामार्गाने बेलदार व तत्सम समाजाचे विशाल निषेध मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा व पोलिस अधिक्षक वर्धा यांना निवेदन दिले जाणार असल्याची माहीती फुलचंद चव्हाण,जिल्हा अध्यक्ष, वर्धा, यांनी दिली आहे.
या निषेध मोर्चा स महाराष्ट्र व विदर्भातील विविध संघटनांचे नेते व पदाधिकारी सह समाज बांधव प्रमुख शहरातून हजारोंच्या संख्येने जनाक्रोष मोर्चात उपस्थीत राहणार असल्याचही त्यांनी म्हटल आहे. सदर मोर्चाचे नेतृत्व रमेश जाधव प्रदेश अध्यक्ष बेलदार भटका समाज महाराष्ट्र राज्य, राजु साळुंखे , भगवान चव्हाण,सुदाम पवार,प्रभू राज चव्हाण,संजय चव्हाण,सुकदेव मोहिते, रोहिदास चव्हाण,संतोष मोहिते,संतोष चव्हाण,राजू चव्हाण,हिम्मत मोहिते,कृष्णा जाधव,रवी चव्हाण,डी. डी. साळुंखे,दिलीप जाधव,यादव पवार, विनोद जाधव व चंद्रशेखर कोटेवार, प्रांतीय अध्यक्ष विदर्भ बेलदार व तत्सम समाज संघटना मुख्यालय चंद्रपूर, आनंदराव अंगलवार महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अखिल भारतीय विमुक्त जाती, भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली, मुकुंदा अडेवार संघर्ष वाहीनी नागपुर, अरविंद गंगुलवार यवतमाळ, संजय कोट्टेवार व पुणे, मुंबई, सह मराठवाडा, खानदेश , विदर्भातील प्रमुख व विविद्ध संघटनांचे प्रमुख सभेत मार्गदर्शन करून मोर्चा निघणार आहे. करिता समाज बांधवांनी बहु संख्येने उपस्थित राहावे असे आयोजन समितीतील फुलचंद चव्हाण अनील चव्हाण, सुधिर ताटेवार वर्धा जिल्हा प्रमुख यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

