Top News

आता विदर्भावाद्यांची आंदोलन तीव्र करण्याची तयारी सुरु .....

आता विदर्भावाद्यांची आंदोलन तीव्र करण्याची तयारी सुरु .....


विदर्भाकरीता लॉंग मार्च व धरणे आंदोलन....


जा गे मारबत करत अकोला करारचे दहन....

 


विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर

स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन तीव्र करण्याच्या मार्गावर नागपूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज दि. ०९ ऑगस्ट २०२२ क्रांतीदिनी विदर्भ राज्याची मागणी करीता, केंद्र सरकारने लावल्रेली अन्न धान्यावरील 5% GST तत्काळ रद्द करण्याकरीता, राज्य सरकारने वाढवलेले विजेचे दर निम्मे करण्याकरीता व २०० युनिट वीज विदर्भातील जनतेला मोफत देण्याकरीता तसेच पूर अतिवृष्टी व ढगफुटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने हेक्टरी ७५००० रुपये तात्काळ मदत राज्य सरकारने जाहीर करण्याकरीता भव्य लॉंग मार्च व्हेरायटी चौक येथून महात्मा गांधी यांना अभिवादन करून काढण्यात आला.  या लॉंग मार्च मध्ये विदर्भवाद्यांनी संपूर्ण रस्ता भर “लेके रहेंगे लेके रहेंगे विदर्भ राज लेके रहेंगे, लाठी गोली खायेंगे विदर्भ राज्य लायेंगे, विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, ये आजादी झुटी है विदर्भ कि जनता भुखी है, कटेंगे मगर ह्टेंगे नही, आवाज दो हम एक है, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, जय विदर्भ जय जय विदर्भ”  अश्या घोषणा केल्या व  संविधान चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सर्व कार्यकर्त्यांसह धरणे देण्यात आले. 

धरणे आंदोलनाला संबोधित करताना विदर्भ आंदोलनाचे नेते मा. अॅड. वामनराव चटप म्हणाले ‘अभी नही तो कभी नही’ , ‘मिशन २०२३ च्या अंतर्गत विदर्भ मिळवू औंदा’ म्हणून सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. स्वातंत्राची प्रेरणा घेऊन आज धो-धो पावसात, नदी नाल्यांचे पूर ओलांडून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले  हे दाखवत आहे की आता विदर्भाचे राज्य दूर नाही,  ज्या जुलमी कराराचे थातूर मातुर आश्वासने देऊन विदर्भाच्या जनतेची सतत फसवणूक करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला त्याची प्रतिक्रिया म्हणून अकोला कराराचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. ही जनतेच्या मनातली चीड त्यावेळच्या सरकारच्या विरोधात आजही आहे हे दर्शवते. 

देशोन्नतीचे संपादक मा. प्रकाशभाऊ पोहरे यांनी आता आंदोलन “शेंडी तुटो कि पारंबी”  या वळणावर आलेले आहे जनतेच्या भावना उमटत चालल्या आहे आता विदर्भ राज्य मिळेपर्यंत विराआंस च्या नेतृत्वात हा लढा शेवटपर्यंत लढू व विदर्भ राज्य मिळवूनच घेऊ, विदर्भातील  प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना सक्रीय रूपाने कश्याप्रकारे आणले जाईल याचे पूर्ण प्रयत्न करू  अश्या भावना विषद केल्या.

महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे यांनी दार आयोग, जेव्हीपी कमिटी, फजल अली आयोग, पी.ए.संगमा समिती या सर्व समित्यानी दिलेल्या विदर्भाच्या बाजूने कौल दिला असूनसुद्धा ११७ वर्षे ओलांडूनही विदर्भ राज्य का झाले नाही ? , स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना विदर्भातील जनतेला स्वतंत्र मिळाले का ? असा सवाल त्यांनी राज्यकर्त्यांना केला. 

जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार, “जो पर्यंत जनता आंदोलनात सामील होत नाही तोपर्यंत केंद्र सरकार दखल घेत नाही  म्हणून सर्वांनी आता लोकसहभाग वाढवून जनआंदोलन करावे. विदर्भ मिळणे ही काळ्या दगडावरची रेख आहे मोदींना मुंबई हवी म्हणून विदर्भ होणारच शिवसेना फुटीचे कारण हेच आहे” असे ते आपल्या भाषणात म्हणाले. 

यावेळी धरणे आंदोलनात ऍड. अजय चमेडिया, किशोर दहेकर, नासिर जुम्मन शेख, राजेंद्र आगरकर, मधुसूदन हरणे, प्रभाकर कोंडबत्तूनवार, देविदास लांजेवार, सुरेश जोगळे, ऍड. सुरेश वानखेडे, वसंत गवळी, मधुकर निस्ताने, शैलजाताई देशपांडे, प्रौटिस्ट ब्लॉक ऑफ इंडिया चे आचार्य संतोषनंद महाराज, माजी मंत्री डॉ. रमेशकुमार गजबे,  माजी पोलीस महासंचालक संचालक व कोअर कमेटी सदस्य प्रबीरकुमार चक्रवर्ती, किसान ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अविनाश काकडे, प्रदीप उबाळे पाटील,  सुदाम राठोड यांची भाषणे झाली. आंदोलनाला आम आदमी पॅन्थर संघटना व जय विदर्भ पार्टी च्या वतीने जाहीर समर्थन देण्यात आले.

धरणे आंदोलनात प्रस्तावना युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी केली.  यादरम्यान धरणे आंदोलनाला विष्णू आष्टीकर, राजेंद्रसिंग ठाकूर, कृष्णराव भोंगाडे, तात्यासाहेब मत्ते, ओमप्रकाश लड्डा, रेखा निमजे, सुनीता येरणे, गुलाबराव धांडे, दामोधर शर्मा, घीसू खुणे पाटील, सतीश प्रेमलवार, रामभाऊ खराटे, सरला सपकाळ, इंदू डोंगरे , सुविद्या बाम्बोडे, कपिल इद्दे, रमेश पिसे, मीतीन भागवत, अशोक कपिले, माधुरी पाझारे, अरविंद तायडे, अंकुश वाघमारे, मनीषा फुंडे, विनोद बाबरे, अशोक पटले, अरुण  जोग, राजकुमार झोटिंग, युवराज साळवे, उल्हास कोटमकर, भाऊराव वानखेडे, सुभाष धोटे, रणजित डोसे, योगेश हरने, विना भोयर, रजनी शुक्ला, सचिन लोणकर, स्वप्नील धवने, नरेश निमजे, राजेंद्र सतई, ज्योती खांडेकर,शोभा येवले, विनायक खोरगडे, संजय चौधरी, ग्यानचंद सहारे, ईश्वर सहारे, मुन्ना आवळे, शारदा हाडके सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post